नवी दिल्ली - माजी अर्थ मंत्री पी.चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने 106 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर जामीन मंजूर केला; आणि बुधवारी संध्याकाळी त्यांची सुटका झाली. यानंतर आज ते काँग्रेसच्या मुख्यालयात पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. तसेच त्यांनी आज संसदेच्या हिवाळी अधिवेशनालाही उपस्थिती लावली आहे.
-
Delhi: Congress leader & Rajya Sabha MP, P. Chidambaram arrives at Parliament. P Chidambaram was yesterday granted bail by Supreme Court in the INX Media money laundering case registered by the Enforcement Directorate. pic.twitter.com/yyOl6ToNlz
— ANI (@ANI) December 5, 2019 ." class="align-text-top noRightClick twitterSection" data="
.">Delhi: Congress leader & Rajya Sabha MP, P. Chidambaram arrives at Parliament. P Chidambaram was yesterday granted bail by Supreme Court in the INX Media money laundering case registered by the Enforcement Directorate. pic.twitter.com/yyOl6ToNlz
— ANI (@ANI) December 5, 2019
.Delhi: Congress leader & Rajya Sabha MP, P. Chidambaram arrives at Parliament. P Chidambaram was yesterday granted bail by Supreme Court in the INX Media money laundering case registered by the Enforcement Directorate. pic.twitter.com/yyOl6ToNlz
— ANI (@ANI) December 5, 2019
चिदंबरम तिहार तुरूंगातून बाहेर आल्यावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी, 106 दिवसांमध्ये आपल्या विरोधात एकही गुन्हा सिद्ध न करता आल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. यानंतर ते थेट काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांच्या दिल्लीतील राहत्या घरी गेले. चिदंबरम यांच्या स्वागताला त्यांचा मुलगा खासदार कार्ती उपस्थित होता. न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना सोडण्यात आले. याआधी संबंधित खटल्यासंदर्भात बोलण्याचे त्यांनी टाळले होते. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या आज्ञेनुसार वागणार असल्याचे त्यांनी कारागृहा बाहेर येताच सांगितले.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर 1 ऑगस्टला त्यांना अटक करण्यात आली होती. अर्थमंत्री असताना आयएनएक्य कंपनीला नियमबाह्य मदत केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात मोठा गैरव्यवहार झाल्याचे आरोप करण्यात आले. सीबीआयकडे हे प्रकरण गेल्यानंतर चिदंबरम यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्यात आले. यानंतर त्यांना 5 सप्टेंबरला न्यायालयील कोठडी सुनवण्यात आली. दरम्यान, त्यांच्यावर सक्तवसुली संचनालयाने मनी लाँडरींगच्या गुन्ह्याखाली कारवाई करत चिदंबरम यांची 17 ते 30 ऑक्टोबर या काळात कस्टडी मिळवली होती.
आता चिदंबरम यांना तत्काळ जामीन मंजूर झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.