नवी दिल्ली - लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री व मंगळवारी भारत व चीनच्या सैनिकांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. यात भारतीय लष्करातील २० जवानांना वीरमरण आले. तर चीनचे जवळपास ४३ जवान ठार झाले आहेत. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना धारेवर धरले आहे. एवढं सगळ होऊनही अजूनपर्यंत पंतप्रधान आणि संरक्षण मंत्र्यांनी मौन सोडले नाही. तसेच या प्रकरणी पंतप्रधानांनी देशाला आत्मविश्वास देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
-
Shocked to learn that 20 of our brave soldiers have been killed in Galwan valley of the western sector. As we salute their martyrdom, the PM must take the nation into confidence. The gravity of the situation calls for a firm & appropriate response.
— Anand Sharma (@AnandSharmaINC) June 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Shocked to learn that 20 of our brave soldiers have been killed in Galwan valley of the western sector. As we salute their martyrdom, the PM must take the nation into confidence. The gravity of the situation calls for a firm & appropriate response.
— Anand Sharma (@AnandSharmaINC) June 16, 2020Shocked to learn that 20 of our brave soldiers have been killed in Galwan valley of the western sector. As we salute their martyrdom, the PM must take the nation into confidence. The gravity of the situation calls for a firm & appropriate response.
— Anand Sharma (@AnandSharmaINC) June 16, 2020
भारतीय लष्करांच्या वतीने सुरुवातील सांगण्यात आले होते की, दोन जवान आणि एक अधिकारी हुतात्मा झाला आहे. मात्र, मंगळवारी रात्री भारतीय लष्कर आणि चीनी सैन्यांमध्ये हल्ला झाला. यात देशाच्या 17 जवानांना वीर मरण तर इतर जवान जखमी झाल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी, महासचिव प्रियंका गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी जवान हुतात्मा झाल्याबद्दल शोक व्यक्त केला आहे.
-
Congress President Smt. Sonia Gandhi offers her condolences to the families of the martyred soldiers in Ladakh. pic.twitter.com/iZL5jNMPSX
— Congress (@INCIndia) June 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Congress President Smt. Sonia Gandhi offers her condolences to the families of the martyred soldiers in Ladakh. pic.twitter.com/iZL5jNMPSX
— Congress (@INCIndia) June 16, 2020Congress President Smt. Sonia Gandhi offers her condolences to the families of the martyred soldiers in Ladakh. pic.twitter.com/iZL5jNMPSX
— Congress (@INCIndia) June 16, 2020
सोनिया गांधी म्हणाल्या, हुतात्मा जवानांबद्दल आदरांजली व्यक्त करून कुटुंबाच्या दु:खामध्ये आम्ही सहभागी आहोत. हुतात्मा जवानांचे बलीदान वाया जाणार नाही. भारतीय लष्करासोबत उभा राहण्याची वेळ असून, देशाची एकात्मता टिकून ठेवण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत.
सीमेवर घडलेल्या या घटनेवरून सरकारने देशाला विश्वासात घ्यायला हवे. तसेच जमिनीवरची खरी परिस्थिती काय आहे, हे सर्व राजकीय पक्षांना सांगण्यासाठी बैठक बोलवावी. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी या घटनेची खातरजमा करावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही घटना गांभीर्याने घेण्याची आहे, असे काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी म्हटले आहे.
काय घडलं भारत-चीन सीमेवर -
सोमवारी चीनच्या सैन्याने लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल (एलएसी) च्या आपल्या बाजूला काही तात्पुरत्या निशाण्या उभ्या केल्या. त्यानंतर आपल्या सैनिकांनी त्या निशाण्या खाली उतरवल्या. सुरुवातीला चीनचे सैनिक मागे हटले, मात्र त्यानंतर ते जवळपास हजार सैनिक घेऊन परत आले. भारताचेही सुमारे हजार सैनिक तिथे होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंसक झटपट झाली. नदीच्या किनारी भागामध्ये ही झटपट सुरू असल्यामुळे कित्येक सैनिक नदीमध्ये पडले.