हैदराबाद - कोरोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना एकत्र येत रविवारी रात्री 9 वाजता घरातील सर्व लाइट्स बंद करुन दिवा आणि मेणबत्ती लावण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार आज रात्री दिवे, मेणबत्ती पेटवताना खबरदारी म्हणून केंद्र शासनाने काळजी घेण्याचा सल्ला दिला आहे.
सॅनिटायझर लावून काडेपेटीतील काडी पेटवू नका, तसे केल्यास सॅनिटायझर लावलेले हात पेट घेऊ शकतात. कारण, त्यामध्ये काही प्रमाणात अल्कोहोल असते. अल्कोहोल हा ज्वलनशील पदार्थ आहे. त्यामुळे मोठा धोका संभवतो. त्यासाठी दिवे लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवून घ्या. तसेच अल्कोहोलचा समावेश असणारे हँड सॅनेटायझर वापरू नका.
हँड सॅनिटायझर हा एक द्रव किंवा जेल आहे जो सामान्यत: हातावर संसर्गजन्य सूक्ष्मजीव कमी करण्यासाठी वापरला जातो. आरोग्य सेवेच्या बहुतांश घटनांमध्ये साबण आणि पाण्याने हात धुणे आहे .पण सॅनिटायझर मध्ये अल्कोहोल-आधारित प्रकारांचे फॉर्म्युलेशन आहे आहे. या अल्कोहोल मध्ये सामान्यत: आयसोप्रोपिल अल्कोहोल, इथेनॉल (इथिल अल्कोहोल) किंवा एन-प्रोपेनॉल यांचे ६०% ते ९५% मिश्रण असते.