ETV Bharat / bharat

बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याच्या वेळी फक्त 28 लोकांना परवानगी

बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यावेळी मुख्य पुजारी, अप्पर धर्मधिकारी आणि इतर पुजा स्थाळांशी संबधीत 28 लोकांना मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यावेळी सर्व सोशल डिस्टंन्स पाळणार आहेत. तसेच भक्तांना मास्क लावणे अनिवार्य असून मंदिर परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

badrinath-temple-
badrinath-temple-
author img

By

Published : May 13, 2020, 8:25 AM IST

डेहराडून - कोरोनाचा ब्रदीनाथ यात्रेवरही परिणाम झाला आहे. बद्रीनाथ धामाचे दरवाजे येत्या 15 मे ला उघडण्यात येणार असून यावेळी पुजाऱ्यांसह फक्त 28 जण बद्रीनाथ मंदिरातील अंखड ज्योतीचे दर्शन करू शकणार आहेत. ही माहिती चमोली जिल्हाधिकारी स्वाती भदौरीया यांनी दिली.

बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यावेळी मुख्य पुजारी, अप्पर धर्मधिकारी आणि इतर पुजा स्थाळांशी संबधीत 28 लोकांना मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. यावेळी सर्व सोशल डिस्टंन्स पाळणार आहेत. तसेच भक्तांना मास्क लावणे अनिवार्य असून मंदिर परिसराचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे.

बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्याच्या वेळी फक्त 28 लोकांना परवानगी

लॉकडाऊनचा परिणाम चारधाम यात्रेवर स्पष्टपणे दिसून येत आहे. कोरोनामुळे टॅक्सी चालक, हॉटेलवाले, व्यापारी आणि चारधाम यात्रेशी संबंधित स्थानिक लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चारधाम यात्रेसाठी सर्व तयारी करण्यात येत असून कोरोना साथीच्या काळातही सरकार आवश्यक पावले उचलत आहे. त्याचबरोबर लॉकडाऊनच्या दरम्यान सरकारने हे स्पष्ट केले आहे की, सध्याच्या परिस्थितीत चारधाममध्ये गर्दी होणार नाही याची काळजी घेतली जाईल.

12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे हिवाळी हंगामामुळे भाविकांच्या दर्शनासाठी बंद ठेवण्यात येतात. आद्य शंकराचार्य यांनी 9व्या शतकात बद्रीनाथची पुनर्स्थापना केली. बद्रीनाथ हे हिंदू धर्मामधील सर्वात पवित्र स्थानांपैकी एक असून ते चार धाम पैकी आहे. येथील बद्रीनाथ मंदिराला दरवर्षी सुमारे लाख भाविक भेट देतात.

बद्रीनाथ मंदिर हे भारत देशाच्या उत्तराखंड राज्यातील बद्रीनाथ गावामधील एक विष्णूचे हिंदू मंदिर आहे. हिंदू धर्मामधील सर्वात मानाच्या पवित्र चार धाम तीर्थक्षेत्रांपैकी बद्रीनाथ मंदिर एक आहे. समुद्रसपाटीपासून 3,133 मी (10,279 फूट) उंचीवर उत्तराखंडच्या चामोली जिह्यात अलकनंदा नदीच्या काठावर असलेले हे मंदिर केवळ काही महिने दर्शनासाठी खुले असते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.