लखनऊ : मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या एका ट्रकचा राज्याच्या बहराइच जिल्ह्यामध्ये अपघात झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा भरधाव ट्रक थेट झाडाला जाऊन धडकला. या ट्रकमधून स्थलांतरीत कामगार आपापल्या घरी परत निघाले होते. या अपघातात एका महिला कामगाराचा मृत्यू झाला असून, काही कामगार जखमी झाले आहेत.
यामध्ये जखमी झालेल्या एका कामगाराने दिलेल्या माहितीनुसार, ट्रकमध्ये एकूण ४० ते ४५ कामगार प्रवास करत होते. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या ट्रकमध्ये ३२ कामगार होते. यांपैकी एका कामगार महिलेचा मृत्यू झाला आहे.
जमिनीवर झोपवून उपचार..
अपघातानंतर पोलिसांनी तातडीने सर्व जखमींना जवळच्या वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथे पुरेशा खाटा उपलब्ध नसल्यामुळे चक्क जमीनीवर झोपवून या मजूरांवर उपचार केले जात होते. यांपैकी बहुतांश कामगार हे गंभीररीत्या जखमी झाले आहेत.
हेही वाचा : उत्तरप्रदेशातील अपघातात दोन स्थलांतरीत कामगार ठार, 14 जखमी