श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या शोपियाँ जिल्ह्यात आज (सोमवारी) पहाटे दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. शोपियाँतील मोलू-चित्रगाम गावात ही घटना घडली.
![One terrorist killed in exchange of fire](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3455000_kashmir.jpg)
रविवारच्या मध्यरात्री सुरक्षा दलाच्या जवानांच्या पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलाच्या जवानांनी गोळीबार केला. रात्री उशिारापर्यंत ही चकमक सुरू होती. यात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.
![One terrorist killed in exchange of fire](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/3455000_kashmirr.jpg)
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या ५ महिन्यात १०० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. असे असले तरी दहशतवादी संघटनांमध्ये भरती होणाऱ्या नवीन तरूणांची वाढती संख्या लष्करासमोरील मोठी समस्या ठरत आहे. गेल्या ५ महिन्यात तब्बल ५० तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झाले आहेत.