सूरजपूर (छत्तीसगड) - राज्यात सतत हत्तींचा मृत्यू होत आहे. आज (16 ऑगस्ट) सकाळी प्रतापपूर परिक्षेत्र मुख्यालयाच्या तीन किलोमीटर अंतरावर करंजवारच्या जंगलात हात्तीचा मृतदेह मिळाला आहे. हत्तीच्या नाकातून रक्त येत असल्याचे सांगण्यात येत आहे. वन विभागाला याबाबत माहिती मिळताच या विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी जंगल परिसरात धावले. शनिवारी (15 ऑगस्ट) या हत्तीचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
मागील काही दिवसांपासून 4 हत्ती धरमपूर, टुकुडांड व प्रतापपूर सर्कलमध्ये फिरत होते. त्यापैकी दोन हत्ती रात्री 8 वाजण्याच्या सुमारास प्रतापपूर-अंबिकापूर रस्त्यावरील चिटकाबहरा जवळील मुख्य रस्ता ओलांडून दलदली क्षेत्रात गेल्याची माहिती सुत्रांनी दिली. सकाळी त्यांपैकी एका हत्तीचा मृतदेह परिक्षेत्र मुख्यालयापासून तीन किमी अंतरावर करंजवारच्या जंगलात आढळला. हत्तीच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
वन्य जीव संरक्षण अधिनियम
- देशात हत्तीला वाघासमान दर्जा प्राप्त आहे. तसेच हत्तीला 2010 मध्ये राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून घोषित करण्यात आला आहे.
- वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972नुसार 2002 मध्ये बंदी हत्तीच्या विक्रीवर प्रतिबंध लावण्यात आले आहे.
वन्य जीव संरक्षण अधिनियम मुख्य घटक-
- वन्यजीव संरक्षण अधिनियम, 1972च्या कलम 40 (2) नुसार मुख्य वन्यजीव वार्डन किंवा अधिकृत अधिकाऱ्याच्या लिखीत परवानगीशिवाय हत्ती पाळणे किंवा त्याचा वाहतूकीसाठी वापर करणे गुन्हा आहे.
- वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 च्या कलम-43 नुसार हत्तीची खरेदी-विक्री करणे किंवा कोणत्याही वस्तूच्या मोबदल्यात हत्ती देण्यावरही बंदी आहे.
- उपखंड (2A), कलम 40 नुसार तहत वाईल्डलाईफ (प्रोटेक्शन) अमेंडमेंट अॅक्ट, 2002 हे नियम लागू झाल्यानंतर प्रमाणपत्र प्राप्त असलेल्या व्यक्तींशिवाय कोणीही जंगली प्राण्यांना पाळू शकत नाही.