ETV Bharat / bharat

बिहार निवडणूक : मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सभेत कार्यकर्त्यांनी दिल्या 'नितीश मुर्दाबाद'च्या घोषणा - Nitish kumar rally news

बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. महाआघाडी विरुद्ध एनडीए अशी सरळ लढत बिहारच्या राजकीय मैदानात बघायला मिळत आहे. त्यात नितीश कुमार रॅली, सभांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत आहेत. अशाच एका सभेदरम्यान, नितीश कुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

once again Murdabad slogans in Nitish rally
बिहार निवडणूक : मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सभेत कार्यकर्त्यांनी दिल्या 'नितीश मुर्दाबाद'च्या घोषणा
author img

By

Published : Oct 26, 2020, 7:09 AM IST

मुजफ्फरपूर - बिहार विधानसभेसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान २८ ऑक्टोबर रोजी होत आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघातील प्रचार शिगेला पोहोचला आहे. नेत्यांकडून राजकीय चिखलफेक सुरू आहे. या दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या एका सभेत, नितीश कुमार यांच्याविरोधातच घोषणाबाजी करण्यात आली.

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सभेत कार्यकर्त्यांनी दिल्या 'नितीश मुर्दाबाद'च्या घोषणा...

बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरूवात झाली आहे. महाआघाडी विरुद्ध एनडीए अशी सरळ लढत बिहारच्या राजकीय मैदानात बघायला मिळत आहे. मात्र, त्याचबरोबर निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या काही महिला उमेदवारही चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अशात नितीश कुमार रॅली, सभांच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत आहेत. अशाच एका सभेदरम्यान, नितीश कुमार यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

मुख्यमंत्री नितीश कुमार कांटी विधानसभा मतदारसंघात प्रचारासाठी, मडवन येथील गांधी जानकी उच्च विद्यालयाच्या मैदानात सभा घेण्यासाठी आले होते. या सभेसाठी ते हेलीकॉप्टरने आले असता, काही कार्यकर्त्यांनी नितीश यांच्याविरोधात घोषणाबाजी सुरू केली. यात त्यांनी 'नितीश मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या. यानंतर सुरक्षारक्षकांनी घोषणाबाजी करणाऱ्यांना सभेच्या ठिकाणावरून बाहेर काढले.

यानंतर सभेला सुरूवात झाली. या सभेला संबोधित करताना नितीश कुमार यांनी, आम्ही प्रचार नाही तर काम करतो, असे सांगितले. यासोबत त्यांनी बिहार हेच माझा परिवार असल्याचे सांगितले. तसेच मुर्दाबादच्या घोषणाबाजी का करत आहात, ज्याचे समर्थन तुम्ही करत आहात, त्यांच्या सभेला जावा, असा सल्ला देखील घोषणाबाजी करणाऱ्यांना दिला.

हेही वाचा - प्रशांत भूषण यांनी सरन्यायाधीश बोबडेंवर केले टि्वट, वाचा काय आहे प्रकरण

हेही वाचा - देशाची सुरक्षा करणाऱ्या जवानांच्या सन्मानार्थ दिवा लावा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे देशवासियांना आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.