जयपूर - राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील एका शाळेतील शिक्षकाने निवृत्तीनंतर आपल्या पत्नीची हेलिकॉप्टरमध्ये बसण्याची इच्छा पूर्ण केली आहे. फक्त 22 किलोमीटरच्या हेलिकॉप्टरच्या परवानगीसाठी 3 लाख 70 हजार रुपये त्यांनी प्रशासनाकडे जमा केले.
-
Alwar: A school teacher Ramesh Chand Meena yesterday booked a helicopter to fly back home in Malawali village, 22 km away from the school, on his retirement day. It was my dream to fly in a chopper & to take my wife in a helicopter sojourn. I thoroughly enjoyed it". #Rajasthan pic.twitter.com/ankfAGkiUM
— ANI (@ANI) August 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Alwar: A school teacher Ramesh Chand Meena yesterday booked a helicopter to fly back home in Malawali village, 22 km away from the school, on his retirement day. It was my dream to fly in a chopper & to take my wife in a helicopter sojourn. I thoroughly enjoyed it". #Rajasthan pic.twitter.com/ankfAGkiUM
— ANI (@ANI) August 31, 2019Alwar: A school teacher Ramesh Chand Meena yesterday booked a helicopter to fly back home in Malawali village, 22 km away from the school, on his retirement day. It was my dream to fly in a chopper & to take my wife in a helicopter sojourn. I thoroughly enjoyed it". #Rajasthan pic.twitter.com/ankfAGkiUM
— ANI (@ANI) August 31, 2019
मलावली गावचे रहिवासी शिक्षक रमेश चंद मीना यांनी पत्नी मीराचे हेलिकॉप्टरमध्ये बसण्याचे स्वप्न पूर्ण केले. सेवानिवृत्तीनंतर शासकीय उच्च माध्यमिक शाळा सौरई येथून पत्नीला हेलिकॉप्टरमध्ये मालवली गावी नेले. यासाठी त्यांनी प्रशासनाच्या परवानगीसाठी ३ लाख 70 हजार रुपये जमा केले. यावेळी हजारो लोक त्यांना पाहण्यासाठी घटनास्थळी हजर होते.
दीड महिन्यापूर्वी ते आपल्या पत्नीसह घराच्या छतावर बसले होते. त्यावेळी तेथून एक हेलिकॉप्टर जात होते. त्याला पाहून त्याच्या पत्नीने विचारले की, या हेलिकॉप्टरमध्ये कसे बसतात आणि त्यामध्ये बसल्यावर कसे वाटते? यानंतर पत्नीच्या मनातील भावना ओळखून त्यांनी पत्नीला हेलिकॉप्टरमध्ये बसविण्याचा निर्णय घेतला होता.