नवी दिल्ली : केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. बुधवारी आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांच्या प्रती जाळत सीमेवरच लोहरी सण साजरा केला. याबाबत शेतकऱ्यांनी अगोदरच इशारा दिला होता. त्यामुळे, खबरदारी म्हणून याठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते.
सर्वोच्च न्यायालयाने दिलीये कायद्यांना स्थगिती..
सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी कृषी कायद्यांविरोधातील याचिकांवर निकाल देत, कृषी कायद्यांवर स्थगिती लागू केली. तसेच, हा वाद सोडवण्यासाठी एका समितीचीही स्थापना करण्यात आली आहे.
स्थगितीनंतरही आंदोलन सुरुच..
कृषी कायद्यांना स्थगिती देण्यात आली असली, तरीही आमची मागणी कायदे रद्द करण्याची आहे असे म्हणत शेतकरी संघटनांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले आहे. जोपर्यंत कृषी कायदे रद्द केले जात नाहीत, आणि एमएसपी लागू होत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरुच राहणार असल्याचे शेतकरी संघटनांचे प्रवक्ते राकेश टिकाईत यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा : राव यांच्या तब्येतीचा आणि वयाचा विचार करा; उच्च न्यायालयाचे एनआयएला निर्देश