कुरुक्षेत्र- कोरोना विषाणूविरुद्ध सध्या सुरू असलेल्या लढाईत पोलीस कर्मचारी कोरोना योद्धाप्रमाणे कार्य करीत आहेत. त्याचबरोबर पोलीस कर्मचारी गरजू नागरिकांची मदतही करीत आहेत. तर कुरुक्षेत्र पोलीस कर्मचाऱ्यांनी एका वृद्धचा वाढदिवस त्यांच्या घरी जाऊन साजरा केला असून त्यांना सुखद धक्काच दिला आहे.
हेही वाचा- Top 10 @ 10 AM : सकाळी दहाच्या १० ठळक बातम्या; वाचा एका क्लिकवर..
कुरुक्षेत्र सेक्टर 7 पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रमनदीप कौर यांना प्रधान सिंग नावाच्या वृद्धाचा वाढदिवस असल्याचे समजले. यावेळी ते आपल्या पथकासह सिंग यांच्या घरी पोहोचले.
प्रधान सिंग यांच्या घरी पोहोचलेल्या पोलिसांच्या पथकाने सर्वप्रथम काटेकोरपणा दाखवत, सिंग यांच्या घरी परदेशातून कोणी आले आहे का, याची विचारपूस केली. प्रधानसिंह यांनी नकार दिला असता अचानक पोलीस पथकांनी त्यांना वाढदिवसाच्या सुभेच्छा दिल्या. तर यावेळी पोलिसांनी सोबत आणलेला केक सिंग यांनी कापला. असाप्रकारे वाढदिवस साजरा करुन सिंग यांना पोलिसांना सुखद धक्का दिलाच दिला.