भुवनेश्वर - ओडिशामध्ये ओला या कॅब सर्विसला अत्यावश्यक सेवा पुरवण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे १०० ओला कॅब्स या आता लोकांना घरातून रुग्णालयापर्यंत, तसेच पुन्हा घरी पोहोचवणार आहेत. भुवनेश्वर आणि कटकमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आली आहे.
परिवाहन आयुक्तांनी याबाबत घोषणा केली. याचा फायदा रुग्णांसह, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही होणार आहे. लॉकडाऊन सुरू असेपर्यंत ही सेवा सुरू राहणार असल्याचेही त्यांनी सांगितले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये लागू असलेला लॉकडाऊन ३० एप्रिलपर्यंत वाढवण्यात आला आहे.
भुवनेश्वरमधील स्थानिक परिवाहन कार्यालयातून 'ओला' गाड्यांना याबाबतचे पासेस आणि इतर माहिती मिळेल. गाडी चालकांना प्रत्येक फेरीच्या वेळी प्रवाशांचे फोटो आणि ओळखपत्र कार्यालयामध्ये पाठवावे लागते. ज्या प्रवाशांकडे ओळखपत्र नसेल, त्यांना ही सुविधा मिळणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : गुड न्यूज: केरळात दिवसभरात 36 जण कोरोनामुक्त, नव्या रुग्णसंख्येत घट