भुवनेश्वर - सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता वावरणाऱ्या नागरिकांकडून ओडिशा पोलिसांनी 1 कोटी 25 लाख रुपये दंड वसूल केला आहे. मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या बैठकीत राज्याचे पोलीस महासंचालक अभय यांनी माहिती दिली.
घराबाहेर पडताना मास्क घालणे ओरिसा सरकारने बंधणकारक केले आहे. तरीही विना मास्क घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांकडून 1 कोटी 25 लाख 84 हजार 180 रुपये दंडाची रक्कम जमा केल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले.
नियम मोडणाऱ्यांकडून राज्यात 200 रुपये दंड घेण्यात येत होता. मात्र, आता 500 रुपये दंड घेण्यात येतो. सलग दुसऱ्यांदा नियम मोडणाऱ्यांकडून 1 हजार रुपये दंड वसूल करण्यात येतो. तर सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यांकडून पोलिसांनी 11 लाख 74 हजार रुपये दंड जमा केला आहे. तर रात्रीच्या संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांकडून 1 लाख 3 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात 'विकएंड शटडाऊन' लागू करण्यात आला आहे. पोलिसांच्या दैनंदिन कामाव्यतिरिक्त नागरिकांमध्ये मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि हात धुण्याबाबत जनजागृती करण्यात येत असल्याचे पोलीस महासंचालकांनी सांगितले.