ETV Bharat / bharat

ओडिशा : भाजलेल्या महिलेल्या मिळाले वेळेत उपचार, गटविकास अधिकार्‍याच्या कार्यतत्परतेचे कौतुक - Odisha BDO

रुमान यांनी या महिलेला खाटेवर झोपवून गावकर्‍यांच्या मदतीने दोन किलोमीटर चालत रस्त्यापर्यंत आणले. येथून त्यांनी स्वतःच्या वाहनाने या महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल केले. या महिलेची स्थिती गंभीर आहे. तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

ओडिशा : कलाहांडी जिल्ह्यातील महिला गटविकास अधिकार्‍याच्या कार्यतत्परतेचे कौतुक

author img

By

Published : Apr 24, 2020, 1:34 PM IST

कलाहांडी - ओडिशातील कलाहांडी जिल्ह्यातील महिला गटविकास अधिकाऱ्यांनी कर्तव्यतत्परतेचे उदाहरण निर्माण केले आहे. रुमान जाफरी असे या महिला अधिकार्‍याचे नाव आहे. रुमान यांनी जिल्ह्यातील एका खेडेगावातील भाजलेल्या महिलेला तिची गंभीर अवस्था लक्षात घेत उपचारांसाठी तत्काळ रुग्णालयात दाखल केले.

ओडिशा : कलाहांडी जिल्ह्यातील महिला गटविकास अधिकार्‍याच्या कार्यतत्परतेचे कौतुक

रुमान या मंडणपूर-रामपूर येथील गटविकास अधिकारी आहेत. जिल्ह्यातील कौपादार गावातील रहिवाशांनी त्यांना एका महिलेची भाजल्यामुळे गंभीर स्थिती असल्याची माहिती दिली. रुमान यांनी तातडीने त्या ठिकाणी धाव घेतली. त्यांना आगीच्या दुर्घटनेत ही महिला जखमी झाल्याचे निदर्शनास आले. रुमान यांनी रुग्णवाहिकेला फोन करून पाचारण केले. मात्र, चालकाने या गावाला जाण्याचा रस्ता डोंगराळ असल्याने तेथे रुग्णवाहिका पोहोचू शकत नसल्याचे सांगत असमर्थता दर्शविली.

यानंतर रुमान यांनी या महिलेला खाटेवर झोपवून गावकर्‍यांच्या मदतीने दोन किलोमीटर चालत रस्त्यापर्यंत आणले. येथून त्यांनी स्वतःच्या वाहनाने या महिलेला शासकीय रुग्णालयात दाखल केले. या महिलेची स्थिती गंभीर आहे. तिला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

गटविकास अधिकारी रुमान जाफरी यांच्या कार्यतत्परतेमुळे त्यांचे मोठे कौतुक होत आहे. महिलेचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी केलेल्या धडपडीची सर्वत्र चर्चा सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.