अहमदाबाद (गुजरात) - अहमदाबाद सिव्हिल रुग्णालयात काम करणाऱ्या एका परिचारिकेने इमारतीच्या 10 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली. शेफाली मॅक्वन असे या परिचारिकेचे नाव आहे.
‘सिव्हिल रुग्णालयात काम करणाऱ्या शेफाली मॅक्वन या परिचारिकेने इमारतीच्या 10 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. तिला मागील दोन दिवसांपासून कसला तरी मोठा मानसिक धक्का बसल्याने तणावात असल्याचे तिच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे,’ अशी माहिती रोमल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एस. एस. कोतवाल यांनी दिली. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.