ETV Bharat / bharat

CORONA आणि प्रशासनाची तयारी.. जाणून घ्या विविध जिल्ह्यातील 'व्हेंटिलेटर'ची सद्यस्थिती - #coronavirus

राज्य प्रशासने कोरोनाशी लढण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करत आहे. याच पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने राज्यातील सर्व जिल्ह्यात सध्याच्या स्थितीला व्हेटिंलेटरची असणारी संख्या आणि त्यांची स्थिती काय आहे, याचा आढावा घेतला आहे.

Number and status of ventilators in various districts of Maharashtra
CORONA आणि प्रशासनाची तयारी.. जाणून घ्या विविध जिल्ह्यातील 'व्हेंटिलेटर'ची सद्यस्थिती
author img

By

Published : Apr 4, 2020, 11:58 AM IST

Updated : Apr 4, 2020, 1:05 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे पुढे काय घडू शकेल, याची कोणतीही शाश्‍वती नसते. त्यावर प्रभावीपणे आणि प्रामाणिकतेने उपाययोजना करणे, तयारीत राहणे हेच गरजेचे असेत. यासाठीच पीपीई, सॅनिटायझर, 'ई-95 मास्क' यांच्यासह कोरोनाग्रस्तांना प्रसंगी व्हेंटिलेटरची देखील गरज भासते. राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा सातत्याने वाढत आहेत. ही परिस्थिती कायम राहिल्यास राज्यात प्रसंगी व्हेटिंलेटरची मागणी वाढू शकते. राज्य प्रशासने कोरोनाशी लढण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना करत आहे. याच पार्श्वभूमीवर ईटीव्ही भारतने राज्यातील सर्व जिल्ह्यात सध्याच्या स्थितीला व्हेटिंलेटरची असणारी संख्या आणि त्यांची स्थिती काय आहे, याचा आढावा घेतला आहे.

मुंबई

महापालिकेच्या केईएम, सायन, नायर, कांदिवली शताब्दी, वांद्रेतील भाभा रुग्णालयात सध्या 450 व्हेंटिलेटर आहेत. त्यात नव्याने 46 व्हेंटिलेटर लावण्यात आले आहेत. तसेच देशात अत्यावश्यक कायदा (एपीडिमिक ऍक्ट) लावण्यात आल्याने खासगी रुग्णालयातील व्हेंटिलेटर आवश्यकता असल्यास ताब्यात घेण्यात येतील.

नागपूर

जिल्ह्यातील व्हेटिंलेटर संदर्भातील माहिती

1. मेडिकल ( शासकीय वैद्यकीय महाविद्यालय)

सध्या 83 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. सर्व चालू स्थितीत आहेत. या शिवाय 250 नवीन व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी शासनाला प्रस्ताव देण्यात आलेला आहे. या व्यतिरिक्त 12 दानशूर व्यक्तींनी व्हेंटिलेटर देण्याची इच्छा दर्शवली असून येत्या काही दिवसांमध्ये ते व्हेंटिलेटर मेडिकल प्रशासनाला प्राप्त होतील, अशी माहिती मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. गावंडे यांनी दिली.

2. मेयो ( इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय)

मेयो रुग्णालयात आता सध्या 30 व्हेंटिलेटर आहेत. सर्व सुस्थितीत आहेत. त्यापैकी 04 व्हेंटिलेटर कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांसाठी आरक्षित करण्यात आलेले आहेत. या शिवाय 200 नवीन व्हेंटिलेटर खरेदी करण्यासाठी शासनाला प्रस्ताव देण्यात आलेला आहे, अशी माहिती मेयोचे जनसंपर्क अधिकारी डॉ सागर पांडे यांनी दिली आहे.

या शिवाय नागपुरातील विविध खासगी रुग्णालयात 400 व्हेंटिलेटर उपलब्ध असून त्यापैकी 350 व्हेंटिलेटर सुस्थितीत असल्याची माहिती व्हेंटिलेटर सप्लाय करणाऱ्या एजंट ( व्यावसायिकाने ) दिली आहे.

औरंगाबाद

जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात 65 व्हेंटिलेटर आहेत, त्यापैकी 46 सुरू आहेत. ज्यात कोरोनासाठी 8 राखीव आहेत. तर मिनी घाटी म्हणजे शासकीय जिल्हा रुग्णालयात 13 व्हेंटिलेटर आहेत.

ठाणे

जिल्ह्यात 36 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत, अशी माहिती जिल्हा सिव्हील सर्जन यांनी दिली.

रायगड

जिल्ह्यात सध्या 63 व्हेंटिलेटर आहेत. तर खासगी रूग्णालयातील व्हेंटिलेटर देखील आवश्यकता असल्यास उपलब्ध होणार आहे. याव्यतिरिक्त 10 व्हेंटिलेटर नव्याने मागवण्यात आले आहेत.

लातूर

जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात 39 तर खासगी रुग्णालयात 30 व्हेंटिलेटरवर आहेत. यापैकी 28 व्हेंटिलेटर हे लातूर येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आहेत. यातील 6 हे कोरोना कक्षात आहेत. तर उर्वरित 11 व्हेंटिलेटर हे उदगीर ग्रामीण रुग्णालय, निलंगा ग्रामीण रुग्णालय येथे असल्याचे सिव्हिल सर्जन संजय ढगे यांनी सांगितले आहे.

अहमदनगर

जिल्ह्यात 6 शासकीय व्हेंटिलेटर आहेत.

चंद्रपूर

जिल्हा सामान्य रुग्णालय आणि क्राईस्ट हे खासगी रुग्णालय यात मिळून 67 व्हेंटिलेटर आहेत.

वाशिम

जिल्ह्यात शासनाचे 2 व्हेंटिलेटर आहेत. तसेच प्रशासनाने 18 व्हेंटिलेटरची मागणी केली आहे. खासगी रुग्णालयात 20 व्हेंटिलेटर आहेत.

अकोला

सरकारी दवाखान्यात 24 आणि खासगी दवाखान्यात 70 व्हेंटिलेटर आहेत.

सोलापूर

जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 21 व्हेंटिलेटर आहेत. हे व्हेंटिलेटर सिव्हील हॉस्पिटलमध्ये असलेल्या वेगवेगळ्या 4 आयसीयुमध्ये आहेत. तर कोरोना वॉर्डमध्ये आगोदर 3 व्हेंटिलेटर होते. नव्याने 5 व्हेंटिलेटर खरेदी केले आहेत. त्यामुळे कोरोना वॉर्डमध्ये एकूण 8 व्हेंटिलेटर आहेत.

जळगाव

जिल्ह्यात शासकीय तसेच खासगी रुग्णालयात मिळून एकूण 28 व्हेंटिलेटर आहेत. त्यात जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 6 व्हेंटिलेटर आहेत. या 6 व्हेंटिलेटरपैकी 2 कोरोना कक्षात तर 4 अन्य वॉर्डात आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील चोपडा उपजिल्हा रुग्णालयात 1 व्हेंटिलेटर आहे, अशी माहिती जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भास्कर खैरे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नागोराव चव्हाण यांनी दिली.

भंडारा

जिल्हा सामान्य रुग्णालयात 17 व्हेंटिलेटर आहेत. तर विविध खासगी रुग्णालयात 23 व्हेंटिलेटर असून गरज पडल्यास ते वापरता येतील.

वर्धा

जिल्हा सामान्य रुग्णालयात 4 व्हेंटिलेटर आहेत. वर्ध्यातील दोन मोठे रुग्णालय कस्तुरबा हॉस्पिटल सेवाग्राम आणि आचार्य विनोबा भावे रुग्णालय सावंगी मेघे, इथेही गरज पडल्यास 40 पेक्षा जास्त व्हेंटिलेटर उपलब्ध होऊ शकेल. दोघांककडे मिळून 80 व्हेंटिलेटर उपलब्ध आहे.

अमरावती

शासकीय रुग्णालयात 18 व्हेंटिलेटर आहेत. खासगी रुग्णालयाचे मिळून एकूण 50 व्हेंटिलेटरची व्यवस्था असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली

बुलडाणा

संपूर्ण जिल्ह्यात 4 व्हेंटिलेटर आहे. बुलडाणा शहरात केवळ 1 व्हेंटिलेटर आहे. खामगावमध्ये 2 आणि शेगावमध्ये 1 व्हेंटिलेटर आहे.

कोल्हापूर

छत्रपती प्रमिलाराजे (CPR) हे शासकीय रुग्णालय आहे. याठिकाणी 29 व्हेंटिलेटर आहेत.

Last Updated : Apr 4, 2020, 1:05 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.