नवी दिल्ली - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राजधानीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यानंतर पार पडलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सीएए आणि एनआरसीला घाबरण्याची गरज नसल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर आता काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी ठाकरे यांना भारतीय नागरिकत्व कायद्यावर संक्षिप्त स्वरूपात माहिती देण्याची आवश्यकता असल्याचे ट्वीट केले आहे. तसेच यासाठी उद्धव ठाकरे यांना नागरिकत्व कायदा नियमावली-२००३ समजावली पाहिजे, असे ते म्हणाले. यामध्ये राष्ट्रीय लोकसंख्या रजिस्टरचा एनआरसीसोबत असलेला संबंध त्यांनी अधोरेखित केला असून एनपीआर केल्यानंतर एनआरसी थांबवता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.
-
CM Maharashtra @UddhavThackarey requires a briefing on Citizenship Amendment Rules -2003 to understand how NPR is basis of NRC. Once you do NPR you can not stop NRC.On CAA-needs to be reacquainted with design of Indian Constitution that religion can not be basis of Citizenship.
— Manish Tewari (@ManishTewari) February 22, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">CM Maharashtra @UddhavThackarey requires a briefing on Citizenship Amendment Rules -2003 to understand how NPR is basis of NRC. Once you do NPR you can not stop NRC.On CAA-needs to be reacquainted with design of Indian Constitution that religion can not be basis of Citizenship.
— Manish Tewari (@ManishTewari) February 22, 2020CM Maharashtra @UddhavThackarey requires a briefing on Citizenship Amendment Rules -2003 to understand how NPR is basis of NRC. Once you do NPR you can not stop NRC.On CAA-needs to be reacquainted with design of Indian Constitution that religion can not be basis of Citizenship.
— Manish Tewari (@ManishTewari) February 22, 2020
सीएए बाबत पुढे बोलताना, भारतीय संविधानाची रचना धर्माच्या आधारावर नागरिकत्व देणारी किंवा नाकारणारी नाही, या बाबीची उद्धव ठाकरेंना पुन्हा ओळख करून देण्याची आवश्यकता आहे, असे तिवारी यांनी म्हटले आहे.