ETV Bharat / bharat

चुपचाप समोर या.. अन्यथा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू; तबलिगींना इशारा - Hiding Tablighis

छत्तीसगडमध्येही राजनंदगाव येथील जिल्हाधिकाऱ्यांनी तबलिघी जमातच्या कारवायांविषयी माहिती दडवणाऱ्या तसेच वैद्यकीय तपासणीसाठी पुढे न येणाऱ्या सदस्यांना कडक इशारा दिला आहे. या सहकार्य न करणाऱ्या व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा, खुनाचा प्रयत्न अशा कलमांखाली आरोप लावले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जयप्रकाश मौर्य यांनी जाहीर केले आहे.

अन्यथा मनुष्यवध, खुनाचा गुन्हा दाखल करू
अन्यथा मनुष्यवध, खुनाचा गुन्हा दाखल करू
author img

By

Published : Apr 11, 2020, 12:38 PM IST

राजनंदगाव - दिल्लीतील निजामुद्दीन मरकज प्रकरणानंतर तबलिगी जमातचे कार्यकर्ते आणि त्याच्याशी संबंधित लोकांभोवती संशयाचे वातावरण तयार झाले आहे. देशभरात जवळजवळ सर्वच राज्यांमध्ये हे लोक आढळून आले आहेत. यातील अनेकांनी मरकजमध्ये सहभाग नोंदवला आहे. त्यांच्यापैकी अनेक जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. हे लोक उपचारांना तसेच प्रशासकीय यंत्रणांना दाद देत नसल्याचेही समोर आले आहे. त्यांच्या अडेलतट्टू धोरणामुळे अनेक राज्यांनी त्यांच्या विरोधात कडक पावले उचलली आहेत.

आता छत्तीसगडमध्येही राजनंदगाव येथील जिल्हाधिकाऱ्यांनी तबलिघी जमातच्या कारवायांविषयी माहिती दडवणाऱ्या तसेच वैद्यकीय तपासणीसाठी पुढे न येणाऱ्या सदस्यांना कडक इशारा दिला आहे. या सहकार्य न करणाऱ्या व्यक्तींवर सदोष मनुष्यवधाचा, खुनाचा प्रयत्न अशा कलमांखाली आरोप लावले जाणार असल्याचे जिल्हाधिकारी जयप्रकाश मौर्य यांनी जाहीर केले आहे.

काही राज्याच्या पोलीस महासंचालकांनीही तबलिघी जमातच्या सदस्यांविरोधात अशा प्रकारचे आदेश जारी केले आहेत. मात्र छत्तीसगडमध्ये अशा प्रकारचा आदेश प्रथमच जाहीर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात तबलिगी जमातीचे अनेक अनुयायी सक्रिय असल्याचे जिल्हाधिकार्‍यांनी या आदेशात म्हटले आहे. कोरोना विषाणूचा फैलाव सुरू झाल्यापासून त्यांच्या कारवाया संशयास्पद आहेत. त्याकडे प्रशासन अत्यंत गांभीर्याने पहात आहे. तबलिघी जमातच्या सदस्यांमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात झालेला पाहायला मिळत आहे, हेही अत्यंत महत्त्वाची बाब आहे.

राज्याचे रहिवासी असलेल्या किंवा बाहेरून राज्यात आलेल्या तबलिघी जमातच्या सर्व सदस्यांना त्यांच्या कारवायांविषयीचे सर्व तपशील सादर करण्याचे आदेश दिले आहेत. येथे 1 मार्च नंतर तबलिघी जमात सदस्यांना भेटण्यासाठी अनेक लोक आल्याची शक्यता आहे. तसेच काही त्यांचे कुटुंबीय असण्याचीही शक्यता आहे. यामुळे हे आदेश जारी करण्यात आले आहेत. या सदस्यांनी ही माहिती उपजिल्हाधिकाऱ्यांना तातडीने सादर करणे आवश्यक आहे. माहिती लपवणाऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत भारतीय दंड विधानाच्या कलम 302 खाली सदोष मनुष्यवध आणि कलम307 खुनाचा प्रयत्न या आरोपांखाली कारवाईला सामोरे जावे लागेल असे, या आदेशात म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.