नवी दिल्ली - संचारबंदीदरम्यान नोएडा प्राधिकरणाने नोएडा अॅथॉरिटी आपूर्ती सुविधा अॅप लॉन्च केले आहे. या अॅपच्या माध्यमातून भाजीपाला, फळे, औषधी आणि किराणा सामान घरापर्यंत पोहोच करून देण्यात येणार आहे. हे अॅप गुगल प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार आहे.
आपूर्ती सुविधा अॅप लॉन्च -
घरातून बाहेर न पडता कोरोनापासून बचाव होण्यास या अॅपचा फायदा होईल. पंतप्रधान मोदींसह सरकार सतत घरातून बाहेर न पडण्याचे किंवा सोशल डिस्टन्सिंग पाडण्याचे आवाहन करत आहे. यामुळे कोरोना संक्रमित लोकांपासून वाचण्यास मदत होईल. यालाच डोळ्यांसमोर ठेवून नोएडा प्राधिकरणाने आपूर्ती सुविधा सेवा अॅप लॉन्च केले आहे.
अॅप कसे वापरणार? -
आपूर्ती अॅप उघडताच दोन पर्याय दिसतील. यात पहिला पर्याय जागा निवडा आणि दुसरा पर्याय सर्व्हिसेसचा आहे. तुमचा सध्याचा पत्ता आणि सर्व्हेसिसमध्ये काय हवे आहे, याचा तपशील भरावा लागेल. यानंतर तुम्हाला संबंधित सेक्टरच्या डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तिचा क्रमांक मिळेल आणि त्यानंतर लगेच ऑर्डर तुमच्या घरी पोहचेल.