ETV Bharat / bharat

नोबेल 2020 : 'यांना' मिळाले रसायनशास्त्रातील नोबेल

रसायनशास्त्र विषयातील यावर्षीचे नोबेल पारितोषिक इमॅन्युएल चार्पेंटीयर आणि जेनिफर ए. दौदना यांना मिळाले आहे.

नोबेल
नोबेल
author img

By

Published : Oct 7, 2020, 3:27 PM IST

Updated : Oct 7, 2020, 3:49 PM IST

स्टॉकहोम - नोबेल पारितोषिक विजेत्यांची घोषणा 5 ते 12 ऑक्टोबरदरम्यान करण्यात येत आहे. आज रसायनशास्त्र विषयातील यावर्षीचे नोबेल पारितोषिक इमॅन्युएल चार्पेंटीयर आणि जेनिफर ए. दौदना यांना जिनोम एडिटिंगसाठी (गुणसुत्रांत बदल घडवून आणण्याची प्रक्रिया) नवी पद्धती विकसित केल्याबद्दल जाहीर झाला आहे. तसेच 8 ऑक्टोबरला साहित्य, 9 ऑक्टोबरला शांतता आणि 12 ऑक्टोबरला अर्थशास्त्राच्या नोबेल पुरस्काराची घोषणा करण्यात येणार आहे.

  • BREAKING NEWS:
    The 2020 #NobelPrize in Chemistry has been awarded to Emmanuelle Charpentier and Jennifer A. Doudna “for the development of a method for genome editing.” pic.twitter.com/CrsnEuSwGD

    — The Nobel Prize (@NobelPrize) October 7, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

जेनिफर ए. दौदना यांचा जन्म 1964 मध्ये वॉशिंग्टनमध्ये झाला होता. त्या प्राध्यपक आहेत. तर इमॅन्युएल चार्पेंटीयर यांचा जन्म 1968 मध्ये फ्रान्समध्ये झाला आहे. जर्मनीच्या बर्लिनमधील रोगविज्ञान शास्त्रातील म‌ॅक्स प्ल‌ॅक युनिटच्या त्या संचालक आहेत.

गेल्या वर्षी यांना मिळाला होता - लिथियम-आयन बॅटरींच्या विकासासाठी गेल्यावर्षी जॉन बी. गुडइनफ एम. स्टॅनली व्हिटिंगहम अन् अकिरो योशिनो यांना नोबेल पारितोषिक संयुक्तपणे देण्यात आले होते.

अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार - नोबेल पारितोषिक हा जगातील अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार मानला जातो. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, जागतिक शांतता, वैद्यकशास्त्र किंवा जीवशास्त्र आणि अर्थशास्त्र या क्षेत्रांतील अतुलनीय कामगिरीसाठी किंवा संशोधनांसाठी दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. स्वीडिश वैज्ञानिक 'अल्फ्रेड नोबेल'ने आपल्या मृत्युपत्रात या पुरस्कारांची तरतूद केली. त्याच्या मृत्यूनंतर पाच वर्षांनी इ.स. 1901 मध्ये सर्वप्रथम हे पुरस्कार देण्यात आले होते.

Last Updated : Oct 7, 2020, 3:49 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.