नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ पाकिस्तानने बंद केल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. याविषयी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांना विचारले असता, 'पाकिस्ताने खरोखरच दहशतवादी तळ बंद केले आहेत का,' हे कळण्यास किंवा त्याची पडताळणी करण्यास मार्ग उपलब्ध नसल्याचे सांगितले. तेव्हा भारतीय लष्कर कोणत्याही प्रकारची हलगर्जी करणार नाही. तसेच, सीमेवर कडक पहारा ठेवण्यात येईल, असे रावत म्हणाले.
पाकिस्तानच्या बाबतीत बेसावध राहण्याचा धोका भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीत पत्करणार नाही, असे रावत म्हणाले. रावत यांनी जम्मू-काश्मीर येथे १४० शाळकरी मुलांची आणि त्यांच्या शिक्षकांची भेट घेतली. हे सर्व विद्यार्थी लष्कराकडून आयोजित करण्यात आलेल्या बहु-शहरी सहलीत सहभागी झाले आहेत.
काही अहवालांच्या आधारे पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळील दहशतवादी जाळे आणि डझनभर दहशतवादी प्रशिक्षण तळ बंद केल्याचे वृत्त होते. भारताची दहशतवादविरोधी कारवाई आणि पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी केल्याचा हा परिणाम असल्याचे यात सुचवण्यात आले आहे.
भारताने बालाकोट येथे हवाई स्ट्राईक करत जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला होता. यानंतर धसका घेत पाकिस्तानने नियंत्रण रेषा आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ बंद केल्याचे अहवाल समोर येत आहेत. मात्र, लष्कर सदैव सावधच राहणार असल्याचे लष्करप्रमुख रावत यांनी म्हटले आहे.
भारताच्या भीतीने पाकिस्तानने पीओकेमधील दहशतवादी तळ बंद केले का? लष्करप्रमुखांचे 'हे' उत्तर - army chief
पाकिस्तानच्या बाबतीत बेसावध राहण्याचा धोका भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीत पत्करणार नाही, असे रावत म्हणाले. रावत यांनी जम्मू-काश्मीर येथे १४० शाळकरी मुलांची आणि त्यांच्या शिक्षकांची भेट घेतली.
नवी दिल्ली - पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ पाकिस्तानने बंद केल्याच्या बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. याविषयी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांना विचारले असता, 'पाकिस्ताने खरोखरच दहशतवादी तळ बंद केले आहेत का,' हे कळण्यास किंवा त्याची पडताळणी करण्यास मार्ग उपलब्ध नसल्याचे सांगितले. तेव्हा भारतीय लष्कर कोणत्याही प्रकारची हलगर्जी करणार नाही. तसेच, सीमेवर कडक पहारा ठेवण्यात येईल, असे रावत म्हणाले.
पाकिस्तानच्या बाबतीत बेसावध राहण्याचा धोका भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीत पत्करणार नाही, असे रावत म्हणाले. रावत यांनी जम्मू-काश्मीर येथे १४० शाळकरी मुलांची आणि त्यांच्या शिक्षकांची भेट घेतली. हे सर्व विद्यार्थी लष्कराकडून आयोजित करण्यात आलेल्या बहु-शहरी सहलीत सहभागी झाले आहेत.
काही अहवालांच्या आधारे पाकिस्तानने नियंत्रण रेषेजवळील दहशतवादी जाळे आणि डझनभर दहशतवादी प्रशिक्षण तळ बंद केल्याचे वृत्त होते. भारताची दहशतवादविरोधी कारवाई आणि पाकिस्तानची आर्थिक नाकेबंदी केल्याचा हा परिणाम असल्याचे यात सुचवण्यात आले आहे.
भारताने बालाकोट येथे हवाई स्ट्राईक करत जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी तळ उद्ध्वस्त केला होता. यानंतर धसका घेत पाकिस्तानने नियंत्रण रेषा आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी तळ बंद केल्याचे अहवाल समोर येत आहेत. मात्र, लष्कर सदैव सावधच राहणार असल्याचे लष्करप्रमुख रावत यांनी म्हटले आहे.
भारताच्या भीतीने पाकिस्तानने पीओकेमधील दहशतवादी तळ बंद केले का? लष्करप्रमुखांचे 'हे' उत्तर

Conclusion: