कोलकाता - प्रदूषण ही गंभीर समस्या आहे. प्रदूषणावर आळा बसवण्यासाठी पश्चिम बंगालच्या कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर फटाक्यावर बंदी आणली आहे. दिवाळी, काली पूजेसाठी फटाके विक्री आणि वापरण्यावर बंदी घातली. या आदेशानुसार काली पूजा मंडळातही नागरिकांना प्रवेश नाही. तसेच कोणत्याही मूर्ती विसर्जनाच्या मिरवणुकीस बंदी आहे.
सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने (एनजीटी) 2 नोव्हेंबरला केंद्र पर्यायवरण विभागाला नोटीस पाठवली होती. राजस्थान, ओडिसा आणि हरयाणा सरकारे यापूर्वी फटाके विक्री-वापरणाऱ्यावर बंदी आणली आहे.
फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी -
हिवाळ्याच्या वातावरणात मोठ्याप्रमाणात हवेचे प्रदुषण होत असते. नागरिकांनी फटाके विरहित दिवाळी साजरी करावी. फटाक्यामुळे ध्वनीप्रदूषण व वायूप्रदूषण होऊन लहान मुले, ज्येष्ठ तसेच श्वसनाचा आजार असणाऱ्या नागरिकांना यांचा मोठ्या प्रमाणात त्रास होतो. यासाठी नागरिकांनी फटाके विरहित दिवाळी साजरी करावी.