भुवनेश्वर - माकपचे महासचिव सीताराम येचुरी आणि भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी ट्रम्प यांच्या दौऱ्याचा भारताला काही फायदा नाही, असे म्हटले आहे. 'अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. मात्र, या दौऱ्याचा भारताला काही उपयोग नाही. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला चालना देणे हा या दौऱ्यामागचा उद्देश आहे,' असे ते म्हणाले.
हे दोन्ही नेते शनिवारी भुवनेश्वरमध्ये एका समारंभात सहभागी होण्यासाठी आले होते.
'ते आपल्या नाही, त्यांच्या स्वतःच्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांमुळे त्यांच्या या दौऱ्याचा भाराताला फायदा होईल, असे दिसत नाही,' असे स्वामी म्हणाले.
'काही संरक्षणविषयक समझोते होण्याची शक्यता आहे. मात्र, याचाही त्यांच्याच देशाला फायादा होईल. इससे भी उनके देश को फायदा मिलेगा. आपण संरक्षणासंबंधी उपकरणांसाठी पैसे मोजत आहोत. ती काही आपल्याला फुकट मिळत नाहीत,' असे स्वामी पुढे म्हणाले.
हेही वाचा - रणथंभोर व्याघ्र प्रकल्पातील तब्बल २६ वाघ गायब, भाजप खासदाराकडून चौकशीची मागणी
'आम्ही ट्रम्प यांच्या दौऱ्यामुळे चिंतित आहोत,' असे येचुरी यांनी सभेला संबोधित करताना म्हटले. 'अमेरिकेचे अध्यक्ष येथे येऊन भारतीय शेतकऱ्यांसमोर संकट उभे करण्याची शक्यता आहे. अमेरिकन शेतकऱ्यांसाठी भारतीय बाजारपेठेत सवलती मिळवण्यासाठी ते येत आहेत.' ट्रम्प 24 फेब्रुवारी दोन दिवसीय दौऱ्यासाठी भारतात पोहोचत आहेत.