हैदराबाद (तेलंगाणा) - राज्यात आणखी एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. निझामाबाद शहर मतदारसंघाचे आमदार गणेश गुप्ता यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आहे. याआधी तेलंगाणाच्या जनगामा मतदार संघाचे आमदार यादगिरी रेड्डी यांनी कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. तसेच निझामाबाद ग्रामीणचे बाजीरेड्डी गोवर्धन यांनादेखील कोरोना झाला होता. दरम्यान, जनगामा मतदार संघाचे आमदार यादगिरी रेड्डी हे उपचारानंतर बरे झाले आहेत.
दरम्यान, राज्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यानंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी तेलंगाणामध्ये २३७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर, तीन लोकांचा कोरोनामुळे बळी गेला. यानंतर राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या ४,९७४वर पोहोचली असून, त्यांपैकी २,४१२ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. तर, आतापर्यंत एकूण १८५ लोकांचा मृत्यू झाला असून, २,३७७ लोकांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.