पाटणा – बिहारच्या निवडणुकीपूर्वीच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडू लागल्या आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे विरोधी पक्षांविरोधात डाव आखत असल्याचा आरोप राष्ट्रीय जनता दलाचे नेता तेजस्वी यादव यांनी केला. नितीश कुमार हे जनता दलाचे (संयुक्त) अध्यक्ष आहेत.
राष्ट्रीय जनता दलाच्या पाच विधानपरिषद आमदारांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. राजीनामा दिलेले आमदार सत्ताधारी जनता दलात (संयुक्त) सहभागी झाले आहेत. त्यामुळे बिहारमधील निवडणुकीच्या तोंडावरच 'राजद'ला मोठा झटका बसला आहे.
तेजस्वी यादव हे राजभवनामध्ये गव्हर्नर फागू चौहान यांची भेट घेण्यासाठी घाईने जात होते. त्यावेळी माध्यमांनी त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, यावर राजदकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेल्या तेजस्वी यादव यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, की माझ्या पक्षातील माजी सहकाऱ्यांना उत्तम शुभेच्छा देतो. नव्या राजकीय घरोब्याकरता त्यांना शुभेच्छा देतो. गेल्या तीन महिन्यांपासून मुख्यमंत्री नितीश कुमार हे त्यांच्या कार्यालयीन घरापुरते मर्यादित राहिले आहेत. याबाबत त्यांचे मी अभिनंदन करतो, असा तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांना टोला लगावला.
ते म्हणाले, की राज्यपालांना दिलेला मेमोरँडम हा सध्याच्या घडामोडीशी निगडीत नाहीत. एससी, एसटी आणि ओबीसीच्या आरक्षणामधील काही तरतूदी काढण्यात येणार आहेत, त्याकडे राज्यपालांचे लक्ष वेधून घेण्याचा हेतू होता. नितीश कुमार यांच्याकडून सर्व घेतलेले निर्णय हे वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपोटी घेतले जातात, असा त्यांनी आरोप केला. तेजस्वी यादव हे राजदकडून मुख्यमंत्रिपदाचे दावेदार आहेत.