ETV Bharat / bharat

नितिश कुमारांनी माझ्या वडिलांचा अपमान केला; चिराग पासवान यांचे जे.पी. नड्डांना पत्र

author img

By

Published : Oct 10, 2020, 6:07 PM IST

लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी दिवंगत रामविलास पासवान यांचा अपमान केल्याचे म्हटले आहे.

Chirag paswan
चिराग पासवान

नवी दिल्ली - बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांनी राज्यसभेच्या निवडणुकीवरुन माझ्या वडिलांचा अपमान केला, असा आरोप लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी केला आहे. गुरुवारी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांचे निधन झाले. रामविलास पासवान यांच्या मृत्यूच्या काही तासांपूर्वी चिराग पासवान यांनी यासंदर्भात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्रही लिहिले आहे.

चिराग पासवान यांनी पत्रात म्हटले की, 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपादरम्यान, राज्यसभेची जागा लोजपाला देण्यात येईल, असे ठरले होते. यावेळी त्यावेळचे भाजपा अध्यक्ष अमित शाह, बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार आणि माझे वडील (रामविलास पासवान) हे उपस्थित होते. मी देखील त्या मिटिंगमध्ये उपस्थित होतो. मात्र, नितिश कुमार यांनी राज्यसभा निवडणुकीदरम्यान माझ्या वडिलांचा अपमान करत रामविलास पासवान यांना पाठिंबा द्यायला, स्पष्ट नकार दिला, असे चिराग यांनी लिहिले आहे.

रामविलास पासवान यांच्या उमेदवारीची घोषणा अमित शाह यांनी नितिश कुमार यांच्या उपस्थितीत केली, असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे. चिराग म्हणाले, राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज भरण्याआधी रामविलास पासवान यांनी नितिश कुमार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. मात्र, त्यांनी माझ्या वडिलांना चांगली वागणूक दिली नाही. अनेकदा विनंती केल्यानंतरही नितीशकुमार यांनी रामविलास पासवान यांच्याबरोबर अर्ज दाखल करण्यासाठी बिहार विधानसभेला गेले नाहीत. अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर नितीश कुमार बिहार विधानसभेत आले. त्यामुळे लोजपा कार्यकर्ता नितिश यांच्यावर चिडले आहेत, असेही चिराग म्हणाले.

  • रामविलास पासवान यांच्याबद्दल -

केंद्रीय अन्नपुरवठामंत्री रामविलास पासवान यांचे गुरुवारी निधन झाले. मागील काही दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्यावर दिल्लीत उपचार सुरू होते. त्यांचे पुत्र चिराग पासवान यांनी ट्विटवरून याची माहिती दिली आहे. यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली. लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष रामविलास पासवान यांचा जन्म 5 जुलै 1946 रोजी खगडियातील दलित कुटुंबात झाला. त्यांनी बुंदेलखंड विद्यापीठ झांसी येथून एम.ए आणि पाटणा विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले.

रामविलास पासवान देशातील अनुभवी नेत्यांपैकी एक होते. पाच दशकांपेक्षा जास्त संसदीय राजकारणाचा अनुभव त्यांच्याकडे होता. ते 9 वेळा लोकसभेवर आणि 2 वेळा राज्यसभेवर निवडून गेले होते. पासवान यांचा राजकीय प्रवास 1960च्या दशकात बिहार विधानसभेचे सदस्य म्हणून सुरू झाला, जो आजपर्यंत सुरू होता. 1969ला बिहारमध्ये राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये संयुक्त समाजवादी पक्षाचे उमेदवार म्हणून पासवान निवडून आले. 1977मध्ये पासवान सहाव्या लोकसभेत जनता पक्षाचे उमेदवार म्हणून निवडून आले होते. 1982च्या लोकसभा निवडणुकीत पासवान दुसऱ्यांदा विजयी झाले.

राजकारणाचा मागावो घेणारे नेते म्हणून त्यांची ओळख होती. देशात आणीबाणीच्या काळात ते काँग्रेसविरोधात तुरुंगात गेले तर, कधी यूपीएच्याच मंत्रिमंडळात मंत्री बनले. त्यावेळी भाजपा पासवान यांच्या निर्णयांचा विरोध करत होती. त्याच भाजपाप्रणित एनडीएच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.