ETV Bharat / bharat

देशातील कोणीही उपाशी राहणार नाही, मदतीसाठी १.७ लाख कोटींचे पॅकेज; अर्थमंत्र्यांची माहिती.. - निर्मला सीतारामन पत्रकार परिषद

देशातील ज्या नागरिकांना तातडीने मदतीची गरज आहे, त्यांच्यासाठी विशेष पॅकेज तयार केल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. सुमारे १.७ लाख कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

Nirmala sitaraman declares package foor poors amid lockdown
देशातील कोणीही उपाशी राहणार नाही, मदतीसाठी पॅकेज तयार आहे; अर्थमंत्र्यांची माहिती..
author img

By

Published : Mar 26, 2020, 1:55 PM IST

Updated : Mar 26, 2020, 2:52 PM IST

नवी दिल्ली - देशातील ज्या नागरिकांना तातडीने मदतीची गरज आहे, त्यांच्यासाठी विशेष पॅकेज तयार केल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. यामध्ये विस्थापीत कामगार तसेच शहरांमधील आणि ग्रामीण भागातील गरीब नागरिकांचा समावेश असणार आहे. सुमारे १.७ लाख कोटी रुपयांची तरतूद यासाठी करण्यात आल्याचे सीतारामन यांनी सांगितले. त्यांनी केलेल्या काही ठळक घोषणा..

  • आरोग्य कर्मचाऱ्यांना ५० लाखांचा विमा..

देशातील प्रत्येक आरोग्य कर्मचाऱ्यांना पुढील तीन महिन्यांसाठी ५० लाखांचा आरोग्य विमा मिळणार आहे. यामध्ये डॉक्टर्स, पॅरामेडिक स्टाफ, आशा वर्कर्स आणि सॅनिटरी वर्कर्सचाही समावेश आहे. याचा सुमारे २० लाख लोकांना फायदा होईल. आशा आहे, की या तीन महिन्यांमध्ये आपण कोरोनावर मात करू, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

  • प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना..

यामध्ये देशातील प्रत्येक नागरिकाला पाच अधिक पाच किलो तांदूळ/गहू मिळणार आहे. तसेच, एक किलो डाळही मिळणार आहे. देशातील सुमारे ८० लाख लोकांना याचा लाभ होणार आहे.

  • शेतकऱ्यांना थेट खात्यात मिळणार रक्कम..

देशातील सुमारे ८.६९ कोटी शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये थेट रक्कम मिळणार आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होतील.

  • मनरेगामधील कर्मचाऱ्यांना पैसे वाढवून मिळणार..

मनरेगा कर्मचाऱ्यांना त्यांच्या वेतनाव्यतिरिक्त प्रत्येकी दोन हजार रुपये मिळणार आहेत. याचा देशातील सुमारे पाच कोटी कुटुंबांना फायदा होईल.

  • उज्ज्वला योजनेंतर्गत मोफत सिलिंडर..

उज्ज्वला योजनेमध्ये असणाऱ्या ८.३ कोटी दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना पुढील तीन महिन्यांसाठी मोफत गॅस सिलिंडर मिळणार आहे.

  • जन-धन खातेदारक महिलांना पुढील तीन महिन्यांसाठी दरमहा ५०० रुपये मिळणार आहेत. सुमारे २० कोटी महिलांना याचा फायदा होईल.
  • सरकार भरणार तुमचा ईपीएफ..

पुढील तीन महिन्यांकरता सरकार कर्मचाऱ्यांचा प्रॉव्हिडंट फंड भरणार आहे. कर्मचाऱ्याचा आणि कंपनीचा दोन्ही वाटा सरकारच भरणार आहे. हे केवळ त्याच कंपन्यांना लागू होणार आहे, ज्या कंपन्यांमध्ये १०० पेक्षा कमी कर्मचारी आहेत, आणि त्यांपैकी ९० टक्के कर्मचाऱ्यांचा पगार १५,००० पेक्षा कमी आहे. देशातील सुमारे पाच कोटी कामगारांना याचा फायदा होणार आहे.

Last Updated : Mar 26, 2020, 2:52 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.