नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने चारही आरोपीं विरोधात डेथ वॉरंट जारी केले आहे. २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता आरोपींना फासावर लटकवले जाणार आहे. त्यानुसार तिहार तुरुंग प्रशासनानं फाशीच्या शिक्षेची तयारी केली असून आरोपींच्या डमी पुतळ्यांना फाशी देण्याचे ट्रायल सुरू केले आहेत.
तुरुंगामध्ये आरोपींच्या वजनाप्रमाणे पुतळ्यामध्ये रेती-दगड भरून एक डमी व्यक्ती तयार करण्यात येते. त्यानंतर डमी व्यक्तीला फाशी देण्यात येते. आरोपींना फाशी देताना वापरण्यात येणारा दोर त्यांच्या वजनानं तुटू नये, यासाठी डमी तयार करून फाशी देण्याच्या शिक्षेचा अभ्यास केला जातो.
आरोपींना तुरुंग क्रमांक 3 मध्ये फाशी देण्यात येणार आहे. मेरठ तुरुंगातील जल्लाद पवन हे दोषींना फासावर लटकवणार आहेत. 4 ही आरोपींना एकाचवेळी फाशी देण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये जल्लाद बोलावण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
निर्भया प्रकरणी निकाल २०१८ पासून प्रलंबित असून आरोपी खटला लांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दिल्ली न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी घेत निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. त्यानुसार आरोपींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फासावर लटकवले जाणार आहे. त्याचबरोबर, आरोपींना १४ जानेवरी पर्यंत न्यायीक उपायांचा वापर करण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. निर्भयाची आई आशा देवी यानी दिल्ली न्यायालयाच्या निकालांवर समाधान व्यक्त केले आहे.
दिल्लीमधील ती काळी रात्र...
१६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दक्षिण दिल्लीतील वसंत विहार भागात सहा नराधमांनी ‘निर्भया’वर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला होता. ‘निर्भया’चा सिंगापूरच्या हॉस्पिटलमध्ये २९ डिसेंबर २०१२ ला मृत्यू झाला होता. दिल्ली व भारतातील इतर ठिकाणी अनेक मोर्चे काढले गेले व निषेध नोंदवला गेला.
निर्भया प्रकरण : आरोपींच्या डमी पुतळ्यांना फाशी देण्याचे ट्रायल सुरू - Dummy execution
निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने चारही आरोपीं विरोधात डेथ वॉरंट जारी केले आहे.
नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टाने चारही आरोपीं विरोधात डेथ वॉरंट जारी केले आहे. २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता आरोपींना फासावर लटकवले जाणार आहे. त्यानुसार तिहार तुरुंग प्रशासनानं फाशीच्या शिक्षेची तयारी केली असून आरोपींच्या डमी पुतळ्यांना फाशी देण्याचे ट्रायल सुरू केले आहेत.
तुरुंगामध्ये आरोपींच्या वजनाप्रमाणे पुतळ्यामध्ये रेती-दगड भरून एक डमी व्यक्ती तयार करण्यात येते. त्यानंतर डमी व्यक्तीला फाशी देण्यात येते. आरोपींना फाशी देताना वापरण्यात येणारा दोर त्यांच्या वजनानं तुटू नये, यासाठी डमी तयार करून फाशी देण्याच्या शिक्षेचा अभ्यास केला जातो.
आरोपींना तुरुंग क्रमांक 3 मध्ये फाशी देण्यात येणार आहे. मेरठ तुरुंगातील जल्लाद पवन हे दोषींना फासावर लटकवणार आहेत. 4 ही आरोपींना एकाचवेळी फाशी देण्यासाठी उत्तर प्रदेशमध्ये जल्लाद बोलावण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
निर्भया प्रकरणी निकाल २०१८ पासून प्रलंबित असून आरोपी खटला लांबवण्याचा प्रयत्न करत असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दिल्ली न्यायालयाने याप्रकरणी सुनावणी घेत निर्भया प्रकरणातील चारही आरोपींना मृत्यूदंडाची शिक्षा दिली आहे. त्यानुसार आरोपींना २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता फासावर लटकवले जाणार आहे. त्याचबरोबर, आरोपींना १४ जानेवरी पर्यंत न्यायीक उपायांचा वापर करण्याची मुभा न्यायालयाने दिली आहे. निर्भयाची आई आशा देवी यानी दिल्ली न्यायालयाच्या निकालांवर समाधान व्यक्त केले आहे.
दिल्लीमधील ती काळी रात्र...
१६ डिसेंबर २०१२ च्या रात्री दक्षिण दिल्लीतील वसंत विहार भागात सहा नराधमांनी ‘निर्भया’वर चालत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार केला होता. ‘निर्भया’चा सिंगापूरच्या हॉस्पिटलमध्ये २९ डिसेंबर २०१२ ला मृत्यू झाला होता. दिल्ली व भारतातील इतर ठिकाणी अनेक मोर्चे काढले गेले व निषेध नोंदवला गेला.
निर्भया प्रकरण : आरोपींच्या डमी पुतळ्यांना फाशी देण्याचे ट्रायल सुरू
नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणी दिल्लीतील पटीयाला हाऊस कोर्टाने चारही आरोपीं विरोधात डेथ वॉरंट जारी केले आहे. २२ जानेवारीला सकाळी ७ वाजता आरोपींना फासावर लटकवले जाणार आहे. त्यानुसार तिहार तुरुंग प्रशासनानं फाशीच्या शिक्षेची तयारी केली असून आरोपींच्या डमी पुतळ्यांना फाशी देण्याचे ट्रायल सुरू केले आहेत.
तुरुंगामध्ये आरोपींच्या वजनाप्रमाणे पुतळ्यामध्ये रेती-दगड भरून एक डमी व्यक्ती तयार करण्यात येते. त्यानंतर डमी व्यक्तीला फाशी देण्यात येते. आरोपींना फाशी देताना वापरण्यात येणारा दोर त्यांच्या वजनानं तुटू नये, यासाठी डमी तयार करून फाशी देण्याच्या शिक्षेचा अभ्यास केला जातो.
आरोपींना तुरुंग क्रमांक 3 मध्ये फाशी देण्यात येणार आहे. मेरठ तुरुंगातील जल्लाद पवन हे दोषींना फासावर लटकवणार आहेत. 4 ही आरोपींना एकाचवेळी फाशी देण्यासाठी उत्तर प्रदेशमधू जल्लाद बोलावण्यात आल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली.

Conclusion: