भोपाळ : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल) या क्रिकेट स्पर्धेवर सट्टा लावल्याप्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये ही कारवाई करण्यात आली.
या टोळीचा शोध इंदूर पोलीस गेल्या काही दिवसांपासून घेत होते. कित्येक वेळा त्यांनी आपली जागा बदलल्यामुळे त्यांना पकडणे अवघड जात होते. यानंतर एका गुप्त ठिकाणी ही टोळी एकत्र भेटणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार कारवाई करत पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच लाख पाच हजारांची रोकड आणि १५ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत. स्टेशन हाऊस अधिकारी रामदिन कनवा यांनी याबाबत माहिती दिली.
यापूर्वी इंदूर पोलीस, राजेंद्र नगर पोलीस आणि क्राईम ब्रांचने संयुक्तपणे कारवाई करत सहा जणांना आयपीएल सट्टा प्रकरणी ताब्यात घेतले होते.
हेही वाचा : भाजपच्या नेत्याने गोळ्या घालून पोलिसांसमोर ४६ वर्षीय व्यक्तीला केले ठार