भौगोलिक संशोधन / जिओग्राफिकल एक्सप्लोरेशन सुलभ करणारी नवीन तंत्रज्ञान प्रणाली नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूटने (NGRI) विकसित केली आहे. ही एक ड्रोन आधारित चुंबकीय संशोधन प्रणाली आहे. याद्वारे खनिजे, भूगर्भीय रचना आणि पृथ्वीच्या तळाचे स्थलांतर अभ्यासने / बेसमेंट टोपोग्राफीचे मॅपिंग करणे शक्य होणार आहे. या प्रणालीच्या विकासाचे संपूर्ण डिझाइन एनजीआरआयनेच केले. या तंत्रज्ञानामुळे वेळेची बचत होऊन दुर्गम भागात वेगाने संशोधन शक्य होईल, असे सीएसआयआर- एनजीआरआयचे संचालक डॉ. व्ही. एम. तिवारी म्हणाले.
11 ऑक्टोबर रोजी संस्थेच्या हीरक महोत्सवी जयंतीनिमित्त डॉ. तिवारी यांची ईनाडूने घेतलेल्या मुलाखतीचा हा संपादित भाग :
- भौगोलिक संशोधनात तंत्रज्ञानाचा किती प्रमाणात उपयोग होतो?
भूजल, खनिजे व हायड्रोकार्बनचा शोध घेण्यास आणि भूकंपाचा झोन शोधण्यात तंत्रज्ञान खूप उपयोगी आहे. आम्ही बर्याच प्रयोगांसाठी चुंबकीय सर्वेक्षण करतो. सुरुवातीला, संशोधक स्वतः खनिजे आणि भूजल शोधत. काही वर्षांपूर्वी आम्ही एका हेलिकॉप्टरच्या मागे मॅग्नेटोमीटर बांधून सर्वेक्षण केले. साहजिकच ती एक खर्चिक आणि वेळखाऊ प्रक्रिया होती. म्हणून, एनजीआरआयने एक ड्रोन किंवा मानव रहित हवाई वाहन (यूएव्ही) आधारित चुंबकीय शोध यंत्रणा विकसित केली. भारतात पहिल्यांदाच अशा प्रकारे हे तंत्रज्ञान वापरले गेले. आम्ही युएव्ही-मॅग्नेटोमीटर वापरुन याचरमचे (हैदराबाद उपनगरातील एक शहर) सर्वेक्षण केले आणि निष्कर्षाअंती येणारे निकाल अचूक होते. या तंत्रज्ञानामुळे दुर्गम डोंगराळ आणि किनारपट्टी भागात भौगोलिक संशोधन करणे अतिशय सुलभ झाले आहे.
- सहा दशकांतील भूकंप लहरींचा अभ्यास कसा होणार आहे?
भूकंपांविषयी अद्याप बरेच निष्कर्ष काढले जाणे बाकी आहे. सध्या, आम्ही केवळ भूकंपाचे झोन आणि थरकापांची तीव्रता ओळखू शकतो. भूकंपांचा अंदाज देईल असे तंत्रज्ञान आम्ही अद्याप विकसित केलेले नाही. भूकंपशास्त्रीय संशोधनात जीपीएस, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग ही आधुनिक तंत्रज्ञाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. देशातील जलसाठा वेगाने कमी होत आहे.
- आपल्या संशोधनादरम्यान, पाण्याचे संकट सोडविण्यासाठी कोणत्या धोरणाचा अभ्यास केला आहे का?
यावर सर्वात जलद आणि सर्वात प्रभावी उपाय म्हणजे कमी झालेले भूजल कृत्रिमरित्या पुनर्भरीत / रिफील करणे. एनजीआरआयने या प्रक्रियेद्वारे चौटप्पलमधील भूजल पातळी वाढविण्यास मदत केली आहे. पृष्ठभागावर आढळून येणारे पाणी जमिनीत कोठून येते किंवा तेथे कुठे खडकाळ प्रदेश आहे का यांसारख्या विविध गोष्टी शिकणे अत्यावश्यक आहे. या गोष्टींचा सखोल अभ्यास केल्यानंतरच पावसाळ्यातील पाण्याची साठवण / रेनवॉटर हार्वेस्टिंगची प्रभावी अंमलबजावणी करता येऊ शकेल. जमिनीत नेमके किती पाणी मुरते आणि जलसाठ्यांपर्यंत पोचते याचा अभ्यास झाला तर आपण विविध पिकांच्या पाण्याची गरज लक्षात घेऊन त्याचे मूल्यांकन करू शकतो.
- तुमची संस्था आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये काही संशोधन करत आहे का?
आंध्र प्रदेशातील कोव्हवाडा येथे अणुऊर्जा प्रकल्प सुरू करण्याबाबत आम्ही संबंधित मंत्रालयाबरोबर काम करत आहोत. सध्या तेलंगणात आमचे कोणतेही प्रकल्प कार्यरत नाहीत. आम्ही अमराबादच्या युरेनियम संशोधन प्रकल्पाचा भाग नाही. आम्ही ओडिशा, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश आणि झारखंडमध्ये संशोधन कामांची पाहणी करीत आहोत.
- आपले आगामी प्रकल्प काय आहेत?
आत्मनिर्भर भारत योजनेचा एक घटक म्हणून आम्ही देशातील नैसर्गिक संसाधनांच्या संशोधनासाठी आवश्यक असणारी उपकरणे व तंत्रज्ञान विकसित करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
- तरुणांसाठी करिअर म्हणून जिओफिजिक्स कसे आहे?
हे क्षेत्र संधींनी पुरेपूर भरलेले आहे. काही वर्षांपूर्वी आयआयटी खरगपूर येथे एकात्मिक भूभौतिकी / इंटेग्रेटेड जिओफिजिक्स अभियांत्रिकी विद्यार्थ्याने कॅम्पस प्लेसमेंटमध्ये सर्वाधिक पॅकेज मिळवले होते. परदेशातही करिअरचे अनेक पर्याय आहेत. तेल, गॅस, पेट्रोलियम आणि कोळसा उद्योगात नोकरीच्या अनेक संधी आहेत. या क्षेत्रांमध्ये मूल्य शृंखलाच्या प्रत्येक स्तरावर स्टार्टअप्स असतात.