नवी दिल्ली - केद्रीय मंत्रीमंडळाचे खातेवाटप जाहीर झाले आहे. अपेक्षेप्रमाणे अमित शाह यांच्याकडे गृहमंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर राजनाथ सिंह यांच्याकडे गृहमंत्रीपदाऐवजी संरक्षण मंत्रीपदाची जबादारी देण्यात आली आहे. मोदी सरकारच्या पहिल्या पर्वातील संरक्षण मंत्री निर्मला सितारमण यांच्याकडे अर्थमंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला आहे. नितिन गडकरी यांच्याकडे दळवणळण मंत्रालय कायम ठेवण्यात आले आहे. तर कृषीमंत्रालयाचा पदभार नरेंद्रसिंह तोमर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
आज दिल्लीत मोदींच्या नवनियुक्त मंत्रीमंडळाची बैठक आयोजीत करण्यात आली होती. या बैठकीत मंत्र्यांना खातेवाटप करण्यात आली. यावेळी अर्थ, गृह, आणि संरक्षण या तिन्ही खात्यांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहे. राजनाथ सिंहांना संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी मिळाली असून त्यांच्याकडील गृहखात्याचा पदभार अमित शाहांकडे सोपवण्यात आला आहे. अरुण जेटलींचा मंत्रीमंडळात समावेश नसल्याने त्यांच्याकडील अर्थखात्याची जबाबदारी माजी संरक्षणमंत्री निर्मला सितारमण यांच्याकडे सोपवण्यात आली. तर सुषमा स्वराज यांच्याकडे असलेले परराष्ट्र खाते माजी परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांच्याकडे देण्यात आले आहे. पीयूष गोयल यांच्याकडे रेल्वे, नितीन गडकरी यांच्याकडे रस्ते वाहतूक दळवळण, धर्मेंद्र प्रधान यांचे पेट्रोलियम, सदानंद गौडा यांच्याकडे खते व रसायन, रामविलास पासवान यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन, ही खाती कायम ठेवण्यात आली आहे.
स्मृती ईराणी यांच्याकडे मागील सरकारमधील मेनका गांधी यांच्याकडील महिला व बालकल्याण खात्याची जबादारी देण्यात आली असून प्रकाश जावडेकर यांच्याकडे मनुष्यबळ विकासमंत्रालयासह, माहीती व प्रसारण तसेच पर्यावरण या महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली.
कॅबिनेट मंत्रीमंडळ -
नरेंद्र मोदी - पंतप्रधान
अमित शाह - गृहमंत्री
राजनाथ सिंह - संरक्षणमत्री
निर्मला सितारमण - अर्थ, सहकारमंत्री
नितीन गडकरी - भूपृष्ट, रस्ते वाहतूक, जहाज मंत्रालय, तथा सूक्ष्म व लघू उद्योगमंत्री
पीयूष गोयल - रेल्वेमंत्री
एस. जयशंकर - परराष्ट्रमंत्री
स्मृती ईराणी - महिला व बालकल्याण वस्त्रोद्योगमंत्री
नरेंद्रसिंह तोमर - कृषी, ग्रामविकास व पंचायतराजमंत्री
प्रकाश जावडेकर - पर्यावरण, वने, हवामानबदल, माहीती, प्रसारणमंत्री
रामविलास पासवान - अन्नपुरवठामंत्री
रविशंकर प्रसाद - कायदा व न्याय, माहीती प्रसारण आणि दूरसंचारमंत्री
अर्जुन मुंडा - आदिवासी विकासमंत्री
हरसिम्रत कौर - अन्न प्रक्रिया उद्योगमंत्री
डी. व्ही. सदानंद गौडा - खते व रसायन उद्योगमंत्री
थावरचंद गेहलोत - सामाजीक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय
डॉ. हर्ष वर्धन - आरोग्य, कुटुंब कल्याण, विज्ञान तंत्रज्ञान, भूगर्भशास्त्रमंत्री
प्रल्हाद जोशी - संसदीय कामकाज, कोळसा व खाणकाममंत्री
धर्मेंद्र प्रधान - पेट्रोलीयम, नैसर्गीक वायू, स्टीलउद्योगमंत्री
मुख्तार अब्बस नक्वी - अल्पसंख्याक विकासमंत्री
डॉ. महेंद्रनाथ पांडे - उद्योजक तथा कौशल्यविकासमंत्री
रमेश पोखरियाल निशांक - मनुष्यबळ विकासमंत्री
अरविंद सावंत - अवजड उद्योगमंत्री