ETV Bharat / bharat

'सिंधियांना श्वान म्हणालोच नाही, जनतेला माहिती आहे'

काँग्रेस नेते कमलनाथ यांनी मला श्वान म्हटल्याचा दावा भाजपा नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केला होता. मात्र, हा दावा कमलनाथ यांनी फेटाळला आहे.

FILE PIC
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Nov 1, 2020, 10:01 PM IST

ग्वाल्हेर - काँग्रेस नेते कमलनाथ यांनी मला श्वान असे संबोधल्याचा दावा भाजपा नेते ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केला होता. मात्र, हा दावा कमलनाथ यांनी फेटाळला आहे. अशोकनगर मतदारसंघातील जनता या सभेला होती, त्यांना हे माहिती असल्याचे कमलनाथ म्हणाले. यावेळी त्यांनी 'आयटम' प्रकरणी सुद्धा बाजू मांडली.

काय म्हणाले होते सिंधिया?

कमलनाथ यांच्यावर टीका करताना सिंधिया म्हणाले, 'कमलनाथजी मला श्वान म्हणाले, होय मी श्वान आहे, आणि जनतेचा सेवक आहे. श्वान त्याच्या मालकाचे रक्षण करतो. जर कोणी घोटाळे करत असेल आणि वाईट हेतू ठेवून योजना आखत असेल, तर हा श्वान त्या व्यक्तीवर हल्ला करेल, असे सिंधिया अशोकनगर जिल्ह्यातील शदोरा येथे रॅलीला संबोधित करताना म्हणाले.

कमलनाथ यांनी दावा फेटाळला

सिंधिया यांनी केलेला दावा कमलनाथ यांनी फेटाळला आहे. अशोक नगर मतरासंघातील जनता त्या सभेला होती, त्यांना हे माहिती असल्याचे कमननाथ म्हणाले. तसेच कमलनाथ यांनी काँग्रेस उमेदवार इमरती देवी यांना आयटम असे संबोधले होते. यावर दु:ख व्यक्त केले. तसेच माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतल्याचेही त्यांनी आधीच स्पष्ट केले.

अटीतटीची निवडणूक

मध्यप्रदेशात विधानसभेच्या २८ जागांसाठी ३ नोव्हेंबरला पोटनिवडणुका होणार आहेत. भाजपाला बहुमतासाठी आठ जागा हव्या असल्याने ही निवडणूक अटीतटीची होणार आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या वर्षाच्या सुरुवातीला काँग्रेस पक्षातून बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यासोबत २० पेक्षा जास्त आमदारांनी पक्ष सोडला होता. त्यानंतर कमलनाथ यांच्या नेतृत्वातील काँग्रेस सरकार कोसळले. राजकीय उलथापालथ झाल्यानंतर शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखाली भाजपा सत्तेत आली. त्यामुळे आता भाजपा सरकार खाली खेचण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.