नवी दिल्ली - जगभरामधील अनेक देशात कोरोना विषाणूवर लस विकसित करण्यात येत आहे. यामध्ये भारताचाही समावेश आहे. 'कोरोनावार लस तयार करणार्या देशांपैकी भारत एक असेल. परंतु, लसीच्या वापरासाठी आणि वितरणासाठी योग्य रणनीती बनविणे आवश्यक असल्याचं राहुल गांधी यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.
'भारत कोरोना विषाणूची लस उत्पादक देशांपैकी एक देश आहे. म्हणूनच देशाला एक स्पष्ट, सर्वसमावेशक रणनीतीची गरज आहे. जेणेकरून लसची उपलब्धता, किंमत आणि वितरण यावर कार्य करता येईल. यावर भारत सरकारने त्वरित कार्य केले पाहिजे', असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे.
यापूर्वी गुरुवारी राहुल गांधींनी कोरोनावरील रुग्णसंख्या दर्शवणारा आलेख शेअर करत मोदी सरकारवर टीका केली होती. 'पंतप्रधानांनुसार जर ही स्थिती स्थिर आहे, तर बिघडलेली परिस्थिती कशाला म्हणात येईल? असा सवाल राहुल गांधींनी टि्वटमधून केला होता.
सध्या भारत बायोटेक अंतर्गत एकूण 12 केंद्रांवर कोरोना विषाणूच्या लसीची चाचणी सुरू आहे. काही ठिकाणी पहिला टप्पा पूर्ण झाला आहे आणि दुसरा टप्पा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होईल. लसीचा मानवी परीक्षांचा टप्पा पार करणार्या देशांपैकी भारत एक आहे.