रायपूर - छत्तीसगडच्या धमतरी येथे नक्षलवादी आणि सीआरपीएफ जवानांमध्ये चकमक झाली. या चकमकीत एका सैनिकाला वीरमरण आले आहे. तर, एक सैनिक गंभीर जखमी झाला आहे. हरीश चंद्र पाल, असे मृत जवानाचे नाव असून तो भोपाळ येथील रहिवासी आहे.
चकमकीची माहिती मिळताच २११ बटालियन घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यापैकी एका जवानास डॉक्टरांनी मृत घोषीत केले. तर, एका जवानावर उपचार सुरू झाले आहेत. तसेच चकमकही थांबली असून सीआरपीएफच्या पथकाने परिसरात शोध मोहिम राबवली आहे.
गुरुवारी छत्तीसगड येथील कांकेर येथे बीएसएफ आणि नक्षलवाद्यांमध्ये हल्ला झाला होता. त्यामध्ये ४ जवानांना वीरमरण आले होते. लोकसभा निवडणूकांना ५ दिवस शिल्लक असताना छत्तीसगडमध्ये नक्षलवादी कारवाईंना उधाण आलेले दिसते.