भारतामध्ये ११ मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. १९९८ साली याच दिवशी भारताने पोखरण अणुचाचणी करून जगाला आपली ताकद दाखवून दिली होती. पोखरण अणुचाचणीला 'ऑपरेशन शक्ती' असे नाव देण्यात आले होते. फक्त अणुतंत्रज्ञानच नाही तर प्रत्येक क्षेत्रातील भारताची तंत्रज्ञानातील प्रगती या दिवशी अधोरेखीत केली जाते.
राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाची कल्पना माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी सर्व प्रथम मांडली. ११ मे १९९८ रोजी भारताने राजस्थानमधील लष्कराच्या पोखरन रेंज या आसोड वाळवंटी भागात यशस्वीरित्या शक्ती-१ न्युक्लिअर मिसाईलची चाचणी केली. भारताची पोखरण-२ चाचणी यशस्वी झाली. चाचणी यशस्वी केल्याची घोषणा अटल बिहारी वाजपेयी यांनी करताचा संपूर्ण जगाला धक्का बसला.
भारताची पहिली अणुचाचणी पोखरण - १
याआधीही भारताने पोखरण १ ही चाचणी मे १९७४ ला घेतली होती. या मिशनला 'स्मायलिंग बुद्धा' असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर तब्बल २४ वर्षांनी भारताने सर्व जगाला अंधारात ठेवून दुसऱ्यांदा यशस्वी अणुचाचणी केली. स्फोटानंतर परिसरातील जमिनीला मोठी मोठी भगदाडे पडली होती.
तंत्रज्ञान विकासातील मैलाचा दगड
११ मे १९९८ या दिवशी भारताने स्व:तचे पहिले विमान तयार केले. हंस-३ असे त्याचे नाव होते. 'नॅशनल एरोस्पेस लॅबोरोटरीजने' याची निर्मिती केली होती. तिकडे अणुचाचणी सुरू असतानाच विमानाने बंगळुरूत ऊडान भरले होते.
११ मे १९९८ ला भारताने त्रिशूल क्षेपणात्राची शेवटची चाचणी घेतली गेली. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने(डीआरडीओ) या क्षेपणास्त्राची निर्मिती केली होती. जमीनीवरुन जमीनीवर मारा करणाऱ्या कमी पल्ल्याचे हे मिसाईल होते. भारतीय लष्कर आणि हवाई दलामध्ये त्याचा समावेश करण्यात आला.
भारताच्या 'इंटिग्रेडेड गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम' अंतर्गत त्रिशूल या क्षेपणास्त्राची निर्मिती करण्यात आली होती. त्यानंतरच्या काळात भारताने पृथ्वी, आकाश आणि अग्नी ह्या अत्याधुनिक क्षेपणास्त्रांची निर्मिती केली.