ETV Bharat / bharat

राष्ट्रीय क्रीडा दिन : हॉकीचे जादुगर मेजर ध्यानचंद यांच्या आठवणींना उजाळा - हॉकीचे जादुगार

मेजर ध्यानचंद हे हॉकीमध्ये जगभरात गाजलेले नाव आहे. त्यांना हॉकीचे जादुगार म्हणून ओळखले जाते. त्यांचा जन्म २९ ऑगस्ट १९०५ रोजी अलाहाबाद शहरात झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर १९२२ ला ते भारतीय लष्करात रूजू झाले. ध्यानचंद यांच्यामध्ये एका खेळाडूचे सर्व गुण होते. लष्करातील सुभेदार मेजर मनोज तिवारी यांनी हॉकी खेळण्यासाठी ध्यानचंद यांना प्रवृत्त केले, त्यांना प्रोत्साहन दिले. स्वत: तिवारी यांना सुद्धा खेळांमध्ये आवड होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ध्यानचंद यांनी हॉकी खेळण्यास सुरुवात केली.

file pic
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Aug 29, 2020, 7:01 AM IST

हैदराबाद - व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी खेळाला अनन्य साधारण महत्त्व आहे. खेळाडू जीवनभर आरोग्यदायी राहतात. भारतामध्ये विविध क्रीडा प्रकार प्रसिद्ध आहेत. अनेक खेळाडू जागतिक स्तरावर चमकलेले आहेत. पी. टी. उषा यांना उडनपरी या नावाने संबोधले जाते तर सचिन तेंडुलकरला 'मास्टर ब्लास्टर' म्हटले जाते. मेजर ध्यानचंद यांना हॉकीचे जादुगर असे म्हटले जाते. राष्ट्रीय क्रीडा दिवस २९ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिन क्रीडा दिन म्हणून देशभरात साजरा करण्यात येतो.

file pic
संग्रहित छायाचित्र

राष्ट्रीय क्रीडा दिनी व्यक्तीच्या जीवनात खेळांच्या महत्त्वाबाबत जनजागृती केली जाते. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी सर्वांनी खेळ खेळले पाहिजेत, असा संदेश दिला जातो. या दिवशी राष्ट्रपती देशातील क्रीडा क्षेत्रात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना खेलरत्न, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार देऊन गौरव करतात.

खेळांमध्ये उत्कृष्ट असल्यामुळे ध्यानचंद यांची १९२७ साली बढती 'लान्स नायक' पदावर झाली. त्यानंतर १९३२ साली नायक पदावर तर १९३६ साली हॉकी टीमचे कॅप्टन असताना त्यांची सुभेदार पदावर बढती झाली. नंतर लेफ्टनंट पदावरून त्यांची बढती मेजर म्हणून झाली.

मेजर ध्यानचंद हॉकी खेळण्यात अतिशय निपूण होते. त्यांना देशातील सर्वकालीन उत्कृष्ट हॉकी खेळाडू समजले जाते. हॉकी खेळताना चेंडूवर नियंत्रण मिळवण्यात, फटका मारण्यात, विरोधी खेळाडूकडून अलगद चेंडू काढून घेण्यात, एखादा नवीनच सर्जनशील फटका मारण्यात ते माहीर होते. त्यांनी भारतीय हॉकीला सर्वोच्च स्थानावर नेऊन ठेवले. ऑलम्पिकमध्ये भारताला हॉकीत त्यांनी ३ सुवर्ण पदके मिळवून दिली. १९२८, १९३२ आणि १९३६ साली भारताने हॉकीतील सुवर्ण पदक जिंकण्याची कामगिरी केली. २२ वर्षाच्या कारकीर्दीत त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर ४०० पेक्षा जास्त गोल केले, तर कारकीर्दीत १ हजारांपेक्षा जास्त गोल केले. १९२६ ते १९४८ या काळात त्यांनी भारतीय क्रीडा क्षेत्राला एक नवी उंची गाठून दिली. त्यांच्यापासून अनेक खेळाडूंनी प्रेरणा घेतली.

file pic
संग्रहित छायाचित्र

राष्ट्रीय क्रीडा दिन २९ ऑगस्टला देशपातळीवर साजरा केला जातो. राष्ट्रपती भवनात या दिवशी समारोह आयोजित केला जातो. क्रीडा क्षेत्रातील मानाचे पुरस्कार विविध खेळाडूंना दिले जातात. यावर्षी कोरोनाचे संकट पाहता पुरस्कार वितरणाचा सोहळा पहिल्यांदाच ऑनलाईन पार पडणार आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुरस्कार विजेत्या खेळाडूंना सन्मानित करणार आहेत.

राष्ट्रीय क्रीडा दिनाचा इतिहास....

खेळाच्या महत्त्वाबाबत जनजागृती करण्याबरोबरच या दिनी मेजर ध्यानचंद यांचे खेळातील योगदान अधोरेखित केले जाते. भारताची समृद्ध क्रीडा संस्कृती आणि वारशात ध्यानचंद यांनी दिलेल्या योगदानाला उजाळा दिला जातो. ध्यानचंद एकमेव खेळा़डू आहेत, त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाला आहे.

pic
पुरस्कार

जाणून घेऊया मेजर ध्यानचंद यांच्याबद्दल...

⦁ अलाहाबाद येथील एका राजपूत परिवारात २९ ऑगस्ट १९०५ ला मेजर ध्यानचंद यांचा जन्म झाला.

⦁ त्यांचे वडील सामेश्वर सिंह हे भारतीय सेनेत होते. ध्यानचंददेखील आपल्या वडिलांप्रमाणेच भारतीय सेनेत दाखल झाले आणि येथूनच त्यांचा हॉकी प्रवास सुरू झाला.

⦁ त्यांचे खरे नाव ध्यानसिंह असे होते. मात्र, ते नेहमी चंद्राच्या प्रकाशात हॉकीचा सराव करीत असत. त्यामुळे त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना 'चंद' म्हणण्यास सुरुवात केली. नंतर ते ध्यानचंद या नावाने ओळखले जाऊ लागले.

⦁ मेजर ध्यानचंद यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ या सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धात हॉकीमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यात विजय मिळवून दिला.

⦁ बर्लिन ऑलिम्पिक १९३६ मध्ये भारतीय संघाने जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलरच्या उपस्थितीत जर्मन संघाला अंतिम फेरीत ८-१ अशी धूळ चारली होती. या विजयासह सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धात सुवर्णपदक जिंकून अनोखी किमया साधली.

⦁ मेजर ध्यानचंद यांनी आंतरराष्ट्रीय हॉकीतील त्यांच्या २२ वर्षाच्या कारकीर्दीत ४०० पेक्षा जास्त गोल करत आपण 'गोल मशीन' असल्याचे सिद्ध केले होते.

⦁ सन १९५६ मध्ये भारत सरकारने त्यांना त्यांच्या हॉकी खेळातील योगदानासाठी पद्म भूषण या सन्मानाने भुषविले, तर भारतीय टपाल सेवेने त्यांच्या स्मरणार्थ टपाल तिकीट प्रसिद्ध केले.

⦁ ध्यानचंद हे भारतीय सेनेतून मेजर या पदावर असताना निवृत्त झाले.

⦁ आपल्या निवृत्तीनंतरदेखील ध्यानचंद यांचे हॉकीतील योगदान कायम राहिले. पटियालामधील राष्ट्रीय क्रीडा संस्थानमध्ये ते हॉकीचे मुख्य प्रशिक्षक होते. शिवाय त्यांनी राजस्थानमधील बऱ्याच प्रशिक्षण कॅम्पमध्येदेखील प्रशिक्षण दिले.

⦁ सन २००२ साली दिल्लीतील 'नॅशनल हॉकी स्टेडिअम'चे नामकरण मेजर ध्यानचंद नॅशनल हॉकी स्टेडिअम असे करण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.