नवी दिल्ली - महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे. जगभरात ८ मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कामगिरी करणाऱ्या महिलांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 'नारी शक्ती पुरस्कार'ने गौरवले आहे.
बिहारच्या बीना देवी, अॅथलेटिक्समध्ये चांगली कामगिरी केल्यामुळे 103 वर्षीय मान कौर, वायूसेनेच्या पहिला महिला फायटर पायलट मोहना जीतरवाल, अवनी चतुर्वेदी आणि भावना कांत यांना राष्ट्रपतींनी नारी शक्ती पुरस्कारने सन्मानित केले आहे. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी जागतिक महिलादिनी ‘नारी शक्ती’ या प्रतिष्ठित पुरस्काराने विविध क्षेत्रांतील महिलांना गौरवले जाते.