ETV Bharat / bharat

'आरोग्य सेतू' अ‍ॅपडाऊनलोड करा, मोदींचे देशवासियांना आवाहन - मोदींचे देशवासियांना आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशवासियांन मोबाईलवर 'आरोग्य सेतू' अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले.

Narendra Modi Urges People To Download Aarogya Setu App

author img

By

Published : Apr 9, 2020, 10:21 AM IST

नवी दिल्ली - जगभरामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारतामध्येही कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकाराकडून अनेक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी देशवासियांना मोबाईलवर 'आरोग्य सेतू' अ‍ॅप डाऊनलोड करण्याचे आवाहन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना विरुद्धच्या लढ्यात आरोग्य सेतू हे एक म्हत्त्वाचे पाऊल आहे. तंत्रज्ञानाच्या मदतीने हे आपल्याल महत्त्वपूर्ण माहिती प्रदान करेल. लोक जितके अधिक या अ‍ॅपचा वापर करतात तितके आधिक ते प्रभावी होईल. सर्वांनी हे अॅप डाऊनलोड करावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टि्वट केले आहे. मोदींनी अ‍ॅपची लिंक शेअर केली जेणेकरुन लोक ते डाउनलोड करु शकतील.

केंद्र सरकारने 2 एप्रिल रोजी एक मोबाइल 'आरोग्य सेतू' अ‍ॅप लाँच केले. ज्यामुळे लोकांना कोरोना विषाणूचा धोका समजण्यास मदत होईल. जेव्हा-जेव्हा तुमच्या जवळपास संसर्ग होण्याचा धोका असेल. तेव्हा प्रशासनाला या अ‍ॅपद्वारे अलर्टही पाठविला जाईल. जर आपण एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या जवळ असाल तर ते प्रशासनाला या अॅपच्या माध्यमातून कळेल.

सध्या हे अ‍ॅप अ‍ॅन्ड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे अ‍ॅप आपल्याला गूगल प्ले आणि अ‍ॅपल स्टोअर मधून डाऊनलोड करता येणार आहे. हे अॅप कोरोनाच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय करावं आणि त्याच्याशी निगडीत सल्ले देत. हे अॅप मराठी आणि हिंदी या भाषांसोबत ११ भाषांमध्ये उपलब्ध आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.