ETV Bharat / bharat

'मै नरेंद्र दामोदरदास मोदी, प्रधानमंत्रीपद की शपथ लेता हूं...' ३० तारखेला राष्ट्रपती भवनात होणार शपथविधी सोहळा - शपथविधी सोहळा

३० मे रोजी सायंकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवन येथे नरेंद्र मोदी १७ व्या लोकसभेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत काही नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : May 26, 2019, 6:04 PM IST

Updated : May 26, 2019, 7:04 PM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजयी झाल्यानंतर एनडीएकडून सरकार स्थापनेला वेग आला आहे. काल (शनिवारी) नरेंद्र मोदींनी राष्ट्रपतींची भेट घेत सरकार स्थापनेचा दावा केला होता. त्यानुसार, ३० मे रोजी सायंकाळी ७ वाजता राष्ट्रपती भवन येथे नरेंद्र मोदी १७ व्या लोकसभेच्या पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत काही नेते मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

शनिवारी सेंट्रल हॉल येथे एनडीएच्या बैठकीत नरेंद्र मोदींची संसदीय नेतेपदी निवड करण्यात आली होती. यानंतर, लवकरच नवीन सरकार स्थापन होण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मोदींनी निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर १६ वी लोकसभा बरखास्त करण्याची शिफारसही राष्ट्रपतींकडे केली होती. नरेंद्र मोदींनी वेळ वाया न घालवता ३० मे रोजीच नवीन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

२३ मे २०१९ रोजी झालेल्या मतमोजणीत भाजपने ३०३ जागांवर विजय मिळवला होता. तर, २०१४ साली भाजपने २८२ जागा जिंकल्या होत्या. १९७१ सालानंतर प्रथमच काँग्रेस सोडून इतर पक्षाने सलग २ वेळा स्वबळावर सत्ता स्थापन केली आहे. १९७१ साली जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळात बहुमतापेक्षा काँग्रेस खासदारांची जास्त होती.

Intro:Body:

National 01

Conclusion:
Last Updated : May 26, 2019, 7:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.