ETV Bharat / bharat

पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार मुख्यमंत्र्यांची कोरोना आढावा बैठक

महाराष्ट्रासह इतर राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून पुन्हा संचारबंदी लागू करण्याची वेळ आल्याचे दिसत आहे. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार) काही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत संचारबंदीसंबंधीही चर्चा होण्याची शक्यता आहे.

author img

By

Published : Nov 23, 2020, 7:51 PM IST

Updated : Nov 24, 2020, 8:54 AM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (मंगळवार) राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेणार आहेत. कोरोना लस वितरण धोरण आणि काही राज्यात नव्याने कोरोना रुग्णांची वाढ होत असल्याने ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ होत असून पुन्हा संचारबंदी लागू करण्याची वेळ आल्याचे दिसत आहे. यातच आज होणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या बैठकीत संचारबंदीसंबंधीही चर्चा होण्याची शक्यता आहे.

सकाळी दहा वाजता कोरोनाचा जास्त फटका बसलेल्या काही राज्यांची बैठक पार पडेल. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश आहे. तर, दुपारी बारा वाजताच्या सुमारास इतर राज्यांची बैठक पार पडेल.

यापूर्वी, 23 सप्टेंबरला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली होती. तर 11 ऑगस्टलाही पंतप्रधान मोदींनी कोरोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेत, त्या राज्यांमधील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला होता. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना विविध सूचनाही केल्या होत्या.

कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ -

देशाता कोरोनाचा प्रसार झाला असून महाराष्ट्र, राजस्थान, छत्तीसगडसह एकूण 15 राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. येथील परिस्थितीचे व्यवस्थापन करण्याकरिता उच्च-स्तरीय केंद्रीय समिती या राज्यांमध्ये रवाना करण्यात आली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिली. दिल्लीत कोरोचा प्रार्दुभाव वाढत आहे. त्यामुळे दिल्लीकडे जाणारी आणि येणारी उड्डाणे कमी करण्याचा महाराष्ट्र सरकार विचार करत आहे. तसेच दिवाळीमुळे बऱ्याच ठिकाणी गर्दी पहायला मिळाली. यामुळे कोरोना संसर्ग वाढत असून येत्या काही दिवसांत लॉकडाउन लावण्यात येऊ शकते, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी दिला.

गुजरात आणि राजस्थानमध्ये नाइट कर्फ्यू -

गुजरातमध्ये कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव बघता अहमदाबाद, सुरत, वडोदरा आणि राजकोटमध्ये या चार शहरांमध्ये सोमवारपासून 'नाइट कर्फ्यू' लागू केला जाईल, असे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी रविवारी सांगितले. तसेच राजस्थान सरकारनेही 8 जिल्ह्यात नाइट कर्फ्यू घोषीत केला आहे. तसेच विवाहसोहळा आणि राजकीय, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये केवळ 100 लोकांनाच परवानगी असेल, असे आदेशही सरकारने दिले आहे.

Last Updated : Nov 24, 2020, 8:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.