ETV Bharat / bharat

मोदींनी मोदींचे आव्हान स्वीकारले अन जिंकलेही - नरेंद्र मोदी - सेंट्रल हॉल

मोदी म्हणाले, मोदींनी स्वत:ला आव्हान केले होते. ते आव्हान स्वीकारले आणि २०१९ साली झालेल्या निवडणुकीत २०१४ सालचे सर्व विक्रम मोडले. आज सेंट्रल हॉलची ही ऐतिहासिक घटना आहे. मी संविधानाला प्रणाम करतो आणि सर्व देशवासीयांचे आभार मानतो.

पंतप्रधान नरेंद्र मोदी
author img

By

Published : May 25, 2019, 8:09 PM IST

नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर एनडीएची बैठक आयोजित करण्यात आली होती. सेंट्रल हॉल येथे पार पडलेल्या बैठकीत एनडीएच्या संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदींची एकमुखाने निवड करण्यात आली. यानंतर, मोदी भाषण करताना म्हटले, की नरेंद्र मोदींनी स्वत:ला आव्हान केले होते. ते आव्हान स्वीकारले आणि २०१९ साली झालेल्या निवडणुकीत २०१४ सालचे सर्व रेकॉर्ड मोडले.

नरेंद्र मोदी भाषणात म्हणाले, आज सेंट्रल हॉलची ही ऐतिहासिक घटना आहे. मी संविधानाला प्रणाम करतो आणि सर्व देशवासियांचे आभार मानतो. देशात प्रचंड मोठा राजकीय बदल झाला आहे. मी नव्या भारताच्या संकल्पनेला सुरुवात करत आहे. मी तुमच्यातीलच एक असून आपल्याला खांद्याला खांदा लावून चालायचे आहे. २०१४ ते २०१९ जनतेने सरकार चालवले आहे. जनता आणि सरकारमध्ये विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे. देशाची लोकशाही परिपक्व होत आहे. प्रचंड जनादेश मिळाल्यामुळे आता जबाबदारी वाढली आहे. लोक मला म्हणतात की मत मागण्यासाठी दौरे केले. परंतु, मी मत मागण्यासाठी दौरे केले नाहीत. २०१९ ची निवडणुकीत केलेले दौरे तीर्थयात्रेसमान होते. देशात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला खासदार झाल्या आहेत. या निवडणुकीत मातृशक्तीने देशाचे भविष्य ठरवले आहे.

अमेरिकेतल्या निवडणुकींशी तुलना करताना मोदी म्हणाले, जगातील नेत्यांना तर आश्चर्यच वाटते. जेवढी मते ट्रम्पला मिळाली आहेत. तेवढी तर एनडीएच्या मतात वाढ झाली आहे. जागतिकदृष्टीने बघितले तर मोदींच्या ताकदीत वाढ झाली आहे. सबका साथ सबका विश्वास जगाने मान्य केला आहे. मला जागतिक नेते सबका साथ सबका विकासाचा अर्थ विचारतात.

नरेंद्र मोदींनी माध्यमात आलेल्या भावी मंत्रिमंडळाच्या बातम्यांना खोटे ठरवले. मोदी म्हणाले, अजून मंत्रिमंडळाचा निर्णय झाला नाही. पहिल्यांदाच खासदार झालेल्यांसाठी मोदी म्हणाले, व्हीआयपी संस्कृतीचा जनता तिरस्कार करते. मनोहर पर्रिकरांचा साधेपणाचा आदर्श सर्वांनी ठेवला पाहिजे. काही वाचाळवीरांमुळे एनडीएच्या अडचणीत वाढ झाली होती. त्यामुळे प्रसिद्धी मिळण्यासाठी काहीही बोलण्यापासून वाचले पाहिजे. तुम्ही नागरिक आहात त्यामुळे रांगेत राहायला कधीही लाजू नका.

मोदी म्हणाले, माझे सरकार हे दलित, शोषित आणि वंचितांना समर्पित आहे. जाती-धर्माच्या नावावर येथे भेदभाव होणार नाही. आपल्या देशावर असलेला विकसनशीलतेचा ठप्पा आपल्याला काढायचा आहे. आपल्याला सर्वांच्या अपेक्षा पूर्ण करताना विकसित बनायचे आहे.

बैठकीच्या सुरुवातीला अमित शाह यांनी एनडीएनच्या संसदीय नेतेपदी नरेंद्र मोदींची निवड करण्याचा प्रस्ताव मांडला. प्रस्तावाला नितिन गडकरी, राजनाथ सिंह यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी समर्थन देत नरेंद्र मोदींची एनडीएच्या संसदीय दलाच्या नेतेपदी निवड केली.

Intro:Body:

Nationl

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.