ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदी औरंगजेबाचा आधुनिक अवतार - संजय निरुपम - Sanjay Nirupam

पंतप्रधान मोदी हे औरंगजेबाचा आधुनिक अवतार असल्याची घणाघाती टीका काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी केली. वाराणसीमध्ये ते माध्यमांशी बोलत होते.

वाराणसी
author img

By

Published : May 8, 2019, 10:32 AM IST

Updated : May 8, 2019, 10:41 AM IST

वाराणसी - काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावर जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी हे औरंगजेबाचा आधुनिक अवतार असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. वाराणसीमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, येथील नागरिकांनी गेल्यावेळी ज्यांना निवडून दिले, ते खरेतर औरंगजेबाचा आधुनिक अवतार आहेत.

काँग्रेस नेते संजय निरुपम
पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरून बनारसमध्ये कॉरिडॉरच्या नावाखाली शेकडो मंदिरे तोडण्यात आली. येथील बाबा विश्वनाथांच्या मंदिरात दर्शनासाठी ५५० रुपयांची फी आकारण्यात येत आहे. अशाप्रकारे फी आकारणे हा या गोष्टीचा पुरावा आहे की, जे काम औरंगजेब करु शकला नाही, ते काम पंतप्रधान मोदी करत आहेत. त्याकाळी औरंगजेब काशीच्या या गल्ल्यांमध्ये गुंडागर्दी करण्यासाठी उतरला होता, आमच्या मंदिरांना तोडण्याची त्याने चूक केली होती. तेव्हाही काशीच्या नागरिकांनी आपल्या मंदिरांना वाचवले होते. तमाम हिंदूंवर औरंगजेबाने जजिया कर लावला होता, तेव्हा हिंदुंनी त्याला विरोध केला होता.आज हिंदू आणि हिंदुस्थानच्या हिताविषयी बोलणारे नरेंद्र मोदी आमची मंदिरे तोडत आहेत. बाबा विश्वनाथाच्या मंदिरात दर्शनासाठी जजिया कर लावत आहेत, हे आधुनिक औरंगजेबच असल्याचे संजय निरुपम म्हणाले.

Intro:Body:

पंतप्रधान मोदी औरंगजेबाचा आधुनिक अवतार - संजय निरुपम

वाराणसी - काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जोरदार हल्लाबोल केला. पंतप्रधान मोदी हे औरंगजेबाचा आधुनिक अवतार असल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. वाराणसीमध्ये माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, येथील नागरिकांनी गेल्यावेळी ज्यांना निवडूण दिले, ते खरेतर औरंगजेबाचा आधुनिक अवतार आहेत.

पंतप्रधान मोदींच्या सांगण्यावरून बनारसमध्ये कॉरिडॉरच्या नावाखाली शेकडो मंदिरे तोडण्यात आली. येथील बाबा विश्वनाथांच्या मंदिरात दर्शनासाठी ५५० रुपयांची फी आकारण्यात येत आहे. हा या गोष्टीचा पुरावा आहे की, जे काम औरंगजेब करु शकला नाही ते काम पंतप्रधान मोदी करत आहेत. त्याकाळी औरंगजेब काशीच्या या गल्ल्यांमध्ये गुंडागर्दी करण्यासाठी उतरला होता, आमच्या मंदिरांना तोडण्याची त्याने चूक केली होती. तेव्हाही काशीच्या नागरिकांनी आपल्या मंदिरांना वाचवले होते. तमाम हिंदूंवर औरंगजेबाने जजिया कर लावला होता, तेव्हा हिंदुंनी त्याला विरोध केला होता.

आज हिंदू आणि हिंदुस्थानच्या हिताविषयी बोलणारे नरेंद्र मोदी आमची मंदिरे तोडत आहेत आणि बाबा विश्वनाथाच्या मंदिरात दर्शनासाठी जजिया कर लावत आहेत, हे आधुनिक औरंगजेबच असल्याचे संजय निरुपम म्हणाले.

Conclusion:
Last Updated : May 8, 2019, 10:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.