पणजी - मुरगाव बंदर हद्दीत दोनापावल येथे अडकलेले पाकिस्तानहून नाफ्ता घेऊन आलेले हे जहाज सुरक्षित आहे. त्यामधील नाफ्ता रिकामी करून जहाज हालविण्याची प्रक्रिया सुरू असून केवळ कंपनी निश्चि करण्याची प्रक्रिया बाकी आहे, अशी माहिती बंदर आणि कप्तान मंत्री मायकल लोबो यांनी दिली आहे. लोबो यांनी जहाज थांबलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केल्यानंतर ही माहिती दिली.
जहाज हलविण्यासाठी प्रशासनाकडून पंधरवडा होत आला तरीही हालचाली न झाल्याने विरोधकांकडून सरकारवर टीका होत होती. स्थानिक मच्छीमारांच्या बोटीही 10 अनेक दिवसांपासून किनाऱ्यावर असल्याने त्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. मुरगाव बंदरात नाफ्तासारखा ज्वालाग्राही पदार्थ भरलेले 'नू शी नलीनी' जहाज आणण्याची परवानगी कोणी दिली याची मौकशी व्हावी अशी मागणीही विरोधकांनी केली होती. त्या पार्श्वभूमीवर लोबो यांनी जहाजाची पाहणी केली.
हेही वाचा - नाफ्ता जहाज रिकामे करण्यासाठी सिंगापूर स्थित कंपनीची घेणार मदत
यावेळी बोलताना लोबो म्हणाले, मुरगाव बंदरात जी रोजची वाहतूक होते अशीच वाहतूक करणाऱ्या जहाजांना परवानगी दिली पाहिजे. अशा प्रकारचे ज्वालाग्राही पदार्थ असणाऱ्या जहाजांना ही परवानगी मिळायला नको. जर या जहाजाबाबत काही दूर्घटना घडली तर त्याचा परिणाम स्थानिकांबरोबर पर्यटन व्यवसायावर होईल. त्यामुळे हे जहाजा लवकरात लवकर रिकामे करून हालविण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. हलविण्याची प्रक्रिया सुरू झाली असून केवळ कोणत्या कंपनीला काम द्यावे एवढा निर्णय होणे बाकी आहे. हे काम व्यावसायिक पद्धतीने आणि सुरक्षितपणे करणाऱ्या सिंगापूर स्थित दोन कंपन्यांनी सरकारकडे आपले प्रस्ताव सादर केले आहेत. त्यामधे एकाची निवड केली जाईल" सरकारी यंत्रणा या जहाजावर लक्ष ठेवून आहे. जेव्हा प्रत्यक्ष जहाज रिकामे करण्याची प्रक्रिया सुरू होईल तेव्हाही प्रशासन लक्ष ठेवून असेल. सध्या ज्या ठिकाणी हे जहाज आहे ते ठीकाण सुरक्षित आहे, असेही लोबो यांनी स्पष्ट केले आहे.