अमरावती - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी वायएसआर काँग्रेस पार्टीचे (वायएसआरसीपी) नेते वाय. एस. जगमोहन रेड्डी यांना फटकारले आहे. रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आंध्रातील अनंतपूर जिल्ह्यामध्ये इर्रामांची गावात कार तयार करण्याचा कारखाना (मॅन्युफॅक्चरिंग प्लँट) सुरू केल्याचे श्रेय दिले होते. किया मोटर्स असे या कारखान्याचे नाव आहे. यानंतर मुख्यमंत्री नायडू यांनी कार्यकर्त्यांशी फोनद्वारे संवाद साधत आपणच या कंपनीला सवलती दिल्यामुळे आंध्रामध्ये हा कारखाना सुरू झाल्याचे म्हटले आहे.
'पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशाशी विश्वासघात केला. माझ्या सरकारने सवलती दिल्यामुळेच किया मोटर्स हा कारखाना आंध्रामध्ये सुरू झाला,' असे नायडू यांनी म्हटले आहे. त्यांनी रेड्डी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
'रेड्डी भाजपशी आणि के. चंद्रशेखर राव यांच्याशी वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना राज्याच्या विकासाशी काहीही कर्तव्य नाही,' अशी टीका नायडू यांनी जगमोहन रेड्डी यांच्यावर केली आहे. तसेच, त्यांनी लोकांना वायएसआरसीपीला मते न देण्याचे आवाहन केले आहे. आंध्र प्रदेशच्या १७५ सदस्यांच्या विधानसभेसाठी आणि लोकसभेच्या २५ जागांसाठी ११ एप्रिलला एकाच वेळी मतदान होणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होईल.
आंध्रामध्ये 'कार मॅन्युफॅक्चरिंग प्लँट' सुरू होण्यामागे मोदींचे नव्हे; माझ्या सरकारचे प्रयत्न - नायडू - car manufacturing plant

आंध्रामध्ये 'कार मॅन्युफॅक्चरिंग प्लँट' सुरू होण्यामागे मोदींचे नव्हे; माझ्या सरकारचे प्रयत्न - नायडू
अमरावती - आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी वायएसआर काँग्रेस पार्टीचे (वायएसआरसीपी) नेते वाय. एस. जनमोहन रेड्डी यांना फटकारले आहे. रेड्डी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना आंध्रातील अनंतपूर जिल्ह्यामध्ये इर्रामांची गावात कार तयार करण्याचा कारखाना (मॅन्युफॅक्चरिंग प्लँट) सुरू केल्याचे श्रेय दिले होते. किया मोटर्स असे या कारखान्याचे नाव आहे. यानंतर मुख्यमंत्री नायडू यांनी कार्यकर्त्यांशी फोनद्वारे संवाद साधत आपणच या कंपनीला सवलती दिल्यामुळे आंध्रामध्ये हा कारखाना सुरू झाल्याचे म्हटले आहे.
'पंतप्रधान मोदींनी आंध्र प्रदेशशी विश्वासघात केला. माझ्या सरकारने सवलती दिल्यामुळेच किया मोटर्स हा कारखाना आंध्रामध्ये सुरू झाला,' असे नायडू यांनी म्हटले आहे. त्यांनी रेड्डी यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
'रेड्डी भाजपशी आणि के. चंद्रशेखर राव यांच्याशी वैयक्तिक राजकीय स्वार्थासाठी मैत्री करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना राज्याच्या विकासाशी काहीही कर्तव्य नाही,' अशी टीका नायडू यांनी जनमोहन रेड्डी यांच्यावर केली आहे. तसेच, त्यांनी लोकांना वायएसआरसीपीला मते न देण्याचे आवाहन केले आहे. आंध्र प्रदेशच्या १७५ सदस्यांच्या विधानसभेसाठी आणि लोकसभेच्या २५ जागांसाठी ११ एप्रिलला एकाच वेळी मतदान होणार आहे. २३ मे रोजी मतमोजणी होईल.
Conclusion: