ETV Bharat / bharat

निर्भया प्रकरण: 'विकृत मानसिकता असेलेल्या व्यक्तींना जगण्याचा अधिकार नाही'

निर्भया प्रकरणात क्रूरतेचा कळस गाठण्यात आला होता. त्यामुळे अशा दोषींना फाशीची शिक्षा देऊन समाजासमोर आपण उदाहरण ठेवल पाहिजे - के. टी. एस तुलसी

के. टी. एस तुलसी
के. टी. एस तुलसी
author img

By

Published : Jan 19, 2020, 8:12 AM IST

नवी दिल्ली - निर्भया प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात येऊ नये, असे वक्तव्य काल ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी केले होते. त्यावर खासदार के. टी. एस तुलसी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विकृत मानसिकता असेलेल्या व्यक्तींना जगण्याचा अधिकार नाही, असे ते म्हणाले. तुसली राज्यसभेचे खासदार असून ज्येष्ठ वकीलही आहेत.

भारतामध्ये दोषींना खूप कमी वेळा फाशीची शिक्षा देण्यात आली आहे, यातून आपण समतोल साधला आहे. मागील १७ वर्षात फक्त ४ दोषींना आपण फासावर चढवले आहे. निर्भया प्रकरणात क्रूरतेचा कळस गाठण्यात आला होता. त्यामुळे अशा दोषींना फाशीची शिक्षा देऊन समाजासमोर आपण उदाहरण ठेवल पाहिजे, असे तुलसी यांनी सांगितले.

निर्भया प्रकरणातील दोषींना माफ करावे, असा सल्ला ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी निर्भायाच्या आईला काल(शनिवारी) दिला आहे. सोनिया गांधींनी ज्याप्रमाणे राजीव गांधीच्या मारेकऱ्यांची फाशीची शिक्षा माफ केली, हे उदाहरण समोर ठेवून दोषींना माफ करावे असे, जयसिंग म्हणाल्या होत्या. यावर निर्भयाच्या आईने नाराजी व्यक्त केली होती. इंदिरा जयसिंग कोण लागून गेल्या. अशा व्यक्तींमुळे बलात्काऱ्यांना सुट मिळते असे निर्भयाते आईने उत्तर दिले होते.

इंदिरा जयसिंग यांच्या वक्तव्यावर भाजप नेत्या शाजिया इल्मी यांनीही टीका केली आहे. यापेक्षा जास्त वेदनादायक आणि लाजीरवाणी गोष्ट नसल्याचे त्या म्हणाल्या.

Intro:Body:

sdfsd

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.