ETV Bharat / bharat

आसाममध्ये 56 लाखापेक्षा जास्त लोकांना महापुराचा फटका, तर 107 जणांचा मृत्यू - floods in Assam

कोकराझार जिल्ह्यातील गौरंग चार गावातून शुक्रवारी एनडीआरएफ पथकाने पूरात अ़डकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढले. आसाममध्ये पूर बचाव कार्यासाठी एनडीआरएफची 16 बचाव पथके तैनात आहेत.

आसाम महापुर
आसाम महापुर
author img

By

Published : Aug 1, 2020, 9:00 AM IST

नवी दिल्ली - आसाममध्ये महापूराने अनेक लोकांचे जीवन विस्कळीत झाले आहे. कोकराझार जिल्ह्यातील गौरंग चार गावातून शुक्रवारी एनडीआरएफ पथकाने पूरात अ़डकलेल्या ग्रामस्थांना बाहेर काढले. आसाममध्ये पूर बचाव कार्यासाठी एनडीआरएफची 16 बचाव पथके तैनात आहेत.

आसाममधील अनेक जिल्ह्यांत पुराचा कहर झाला. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (एएसडीएमए) च्या पूर अहवालात गुरुवारी नमूद करण्यात आले आहे की, पूरात एकूण 107 जणांचा मृत्यू झाला असून 5,305 खेड्यांतील 56 लाखापेक्षा अधिक लोक बाधित झाले आहेत.

राज्यात आतापर्यंत एकूण 30 जिल्ह्यांना पूराचा फटका बसला आहे. तर 130 महसूल मंडळे बाधित झाली आहेत. तसेच ब्रह्मपुत्र नदीने पुन्हा धोकादायक पातळी ओलांडली आहे.

दरम्यान, आसामचे मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी बुधवारी पूरग्रस्त भागांचा दौरा केला होता. सोनोवाल यांनी धिमाजी जिल्ह्यातील भुजगाव परिसराला भेट देऊन बाधित लोकांमध्ये मदत साहित्य वाटप केले.

महापुरामुळे विविध ठिकाणी रस्ते, पूल आणि इतर अनेक पायाभूत सुविधांचे नुकसान झाले आहे. राज्यातील वन्यजीवनावरही तीव्र परिणाम झाला आहे. राज्य सरकारने सांगितले की, काझीरंगा नॅशनल पार्क आणि टायगर रिझर्व्ह येथील बहुतांश भाग पाण्याखाली गेला आहे. काही प्राण्यांचाही मृत्यू झाला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.