बंगळुरू - कर्नाटकातील बंगळुरू येथून कोब्राच्या ३५ हून अधिक पिल्लांची सुटका करण्यात आली. बृहत बंगळुरू महानगर पालिकेच्या सर्प मित्र राजेश आणि विवेक प्रसाद यांनी रविवारी विविध ठिकाणांहून या नागाच्या (कोब्रा) पिल्लांची सुटका केली.
ही नागाची पिल्ले पादत्राणे, बेड, घरांची कपाऊंडस येथे आढळून आली. विद्यारण्यपुरा, सहकार नगर आणि अमृत व्हॅली येथून ही नागांची पिल्ले ताब्यात घेण्यात आली होती.