नवी दिल्ली - देशभरामध्ये आत्तापर्यंत 2 हजार 301 कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. तर 56 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातीत 12 जणांचा काल (गुरुवार) दिवसभरात मृत्यू झाला तर 336 नव्याने कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
-
12 of these 56 deaths were reported yesterday. A total of 157 patients have recovered so far: Lav Agarwal, Joint Secretary, Health Ministry #Coronavirus https://t.co/6ZHEHUtIiJ
— ANI (@ANI) April 3, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">12 of these 56 deaths were reported yesterday. A total of 157 patients have recovered so far: Lav Agarwal, Joint Secretary, Health Ministry #Coronavirus https://t.co/6ZHEHUtIiJ
— ANI (@ANI) April 3, 202012 of these 56 deaths were reported yesterday. A total of 157 patients have recovered so far: Lav Agarwal, Joint Secretary, Health Ministry #Coronavirus https://t.co/6ZHEHUtIiJ
— ANI (@ANI) April 3, 2020
मागील 2 दिवसांत तबलिगी जमात धार्मिक कार्यक्रमाशी संबंधित 647 जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 14 राज्यांमध्ये या कार्यक्रमाशी संबंधित रुग्ण आढळून आले आहेत. अंदमान निकोबार, आसाम, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड, कर्नाटक, महाराष्ट्र, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगाणा, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश राज्यामध्ये तबलिघी जमात कार्यक्रमाला गेलेले रुग्ण आढळून आले आहेत. दिलासादायक बातमी म्हणजे 156 जण पूर्णपणे बरे झाले आहेत.
आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कामामध्ये अडथळा आणू नका
आरोग्य कर्माचारी काम करत असताना रुग्ण आणि नातेवाईकांनी त्यांच्या कामामध्ये अडथळा आणू नका, असे आवाहन आरोग्य मंत्री हर्ष वर्धन यांनी केले आहे. डॉक्टर आणि नर्स यांच्याशी असभ्य वर्तन करण्यावरून त्यांनी चिंता व्यक्त केली आहे, अशी माहिती आरोग्य सचिव लव अगरवाल यांनी दिली.