वाराणसी - गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस उरले आहेत. यामुळे सगळीकडे बाप्पाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. गणपतीची प्रतिष्ठापना शास्त्रशुद्ध पद्धतीने कशी करायची याबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते. गणपती बाप्पाना योग्य मुहूर्तावर घरी स्थापना करण्यासंबधीत माहिती काशीच्या विद्वानांनी दिली आहे.
येत्या सोमवारी गणपतीचं आगमन होणार आहे. कोणी 2 दिवस तर कोणी 7 दिवस तर कोणी 10 दिवस गणपतीचे पुजन करतात. सोमवारी गणपतीची स्थापना करताना ज्या वेळी चंद्रोदय होईल तोच मुहूर्त हा स्थापनेसाठी योग्य असल्याचं काशी विश्वविद्यालयाचे प्राध्यापक विनय पांडे यांनी सांगितले आहे.
देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी गणपतीची पुजा केली जाते. मात्र शास्त्रासंबधीत चार विधी असून त्यांचे पालन करने चांगले असते. षोडशोपचार, पंचोपचार, मानसोपचार आणि राजोपचार पद्धतीने गणपतीची पुजा केली जाते.