ETV Bharat / bharat

देशातील कोरोना संबंधी महत्त्वाच्या घडामोडी...वाचा एका क्लिकवर - भारत कोरोना अपडेट

कोरोनातून बरे होण्याचा देशातील दर 78 टक्के आहे. देशातील कोरोना मृत्यूदर कमी होऊन 1.64 टक्के झाला. सध्या देशातील विविध रुग्णालयांमध्ये 9,86,598 इतके रुग्ण उपचार घेत असून 37,80,107 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

कोरोना
कोरोना
author img

By

Published : Sep 15, 2020, 4:32 AM IST

नवी दिल्ली - कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सोमवारी देशात नव्या 92 हजार 071 कोरोना रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 48,46,427 एवढा झाला आहे. दिवसभरात 1136 रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 79 हजार 722 इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत 37,80,107 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

कोरोना साथीच्या रोगाचा सर्वात मोठा फटका महाराष्ट्राला बसला आहे. त्यानंतर आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेश यांचा क्रमांक लागतो. कोरोना रुग्णांच्या बाबतीत भारत हा अमेरिकेनंतर जगातील दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. कोरोनातून बरे होण्याचा देशातील दर 78 टक्के आहे. देशातील कोरोना मृत्यूदर कमी होऊन 1.64 टक्के झाला. सध्या देशातील विविध रुग्णालयांमध्ये 9,86,598 इतके रुग्ण उपचार घेत असून 37,80,107 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत, असे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.

कोरोना आकडेवारी
कोरोना आकडेवारी

दिल्ली -

सोमवारी संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी अनिवार्य चाचणीत कोरोना विषाणूची लागण झालेल्या 17 सदस्यांपैकी भारतीय जनता पक्षाचे खासदार मीनाक्षी लेखी, अनंत कुमार हेगडे आणि प्रवेश साहिबसिंग वर्मा यांचा समावेश आहे. लोकसभेत भाजपचे सर्वाधिक 12 खासदार कोरोना संक्रमित आहेत, तर वायएसआर कॉंग्रेसचे दोन खासदार आणि द्रमुक, शिवसेना आणि आरएलपी या पक्षांचा प्रत्येकी एक खासदार संक्रमित आहे.

याशिवाय प्रतापराव जाधव, जनार्दनसिंग, सुखबीरसिंग, हनुमान बेनीवाल, सुकांत मजूमदार, गोडेती माधवी, विद्युत बारण, प्रदन बरुआ, एन.के. रेडप्पा, सेल्वम जी, प्रतापराव पाटील, राम शंकर कथेरिया, सत्यपाल सिंग आणि रोडमल नागर या खासदारांचाही बाधितांमध्ये समावेश आहे.

राष्ट्रीय राजधानीत कोरोना विषाणूमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जगातील सर्वात कमी आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येची काळजी करण्याची गरज नसून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची काळजी करण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. विधानसभेच्या एक दिवसीय अधिवेशनात बोलताना त्यांनी सांगितले की, दिल्लीत सर्वाधिक कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत.

केरळ -

सोमवारी केरळ राज्यात 2,540 नवे कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यातील एकूण बाधितांची संख्या आता 1,10,818 एवढी झाली आहे. 15 रुग्णांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत एकूण 454 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

मल्लपूरममध्ये सर्वाधिक 482 संक्रमित रुग्ण सापडले आहेत. यानंतर कोझिकोड येथे 382, ​​तिरुवनंतपुरममधील 332, एर्नाकुलममधील 255 आणि कन्नूरमधील 232 रुग्णसंख्या नोंदविण्यात आली आहे. त्याचवेळी वायनाडमधून 20 आणि पठाणमथिट्टामधील 16 प्रकरणे नोंदविली गेली आहेत.

हरियाणा -

कोरोनातून बरे झाल्यानंतर सोमवारी हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर राज्याची राजधानी चंदीगडला परतले. त्यांनी सुरक्षित राहण्यासाठी लोकांना मास्क घाला आणि शारीरिक अंतरासारख्या सर्व मार्गदर्शक सूचना पाळण्याचे आवाहन केले आहे.

खट्टर म्हणाले की, कोरोना विषाणूची भीती बाळगण्याऐवजी यासाठी सावध राहण्याची गरज आहे. विधानसभेचे एक दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या दोन दिवस अगोदर खट्टर यांना 24 ऑगस्ट रोजी कोरोना विषाणूची लागण झाली होती. त्यांना गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती आता चांगली आहे.

उत्तराखंड -

उत्तराखंडमध्ये येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने आयसीएमआरच्या अधिकृत प्रयोगशाळेत कोरोना चाचणी केल्याचा अहवाल दाखविल्यास त्यांना संस्थात्मक आणि गृह विलगीकरणातून सूट देण्यात येईल. एखाद्या व्यक्तीला कुठे बाहेर प्रवासाला जायचे असल्यास त्याने 96 तासांपूर्वी कोरोनाची चाचणी करावी, असे राज्याच्या मुख्य सचिवांनी सांगितले आहे. याशिवाय कोरोना चाचणी आता राज्याच्या सीमेवरच होईल, असेही सांगण्यात आले आहे.

हेही वाचा - कोरोना पॉझिटिव्ह महिलेला निगेटिव्ह सांगून पाठवले घरी, दुसऱ्या दिवशी महिलेचा मृत्यू..!

हेही वाचा - राज्यात सोमवारी १७ हजार ६६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.